जुन्नर : पिंपरवाडी (ता. जुन्नर ) या गावाजवळ सकाळी ८:३० वाजता २ गवे ग्रामस्थांना आढळून आले आहे.
याबाबतची माहिती देताना पिंपरवाडीचे पोलिस पाटील विष्णू घोडे यांनी सांगितले, की आज सकाळी गावातील मुले शेताकडे जात असताना पिंपरवाडी गावाजवळ २ गवे दिसून आले. मुलं गव्यांना पाहण्यासाठी गेले असता गव्यांनी ढाकोबा डोंगराच्या दिशेने धुम ठोकली.
जुन्नर : किसान सभेचे आमरण उपोषण सुरू, चर्चेची पहिला फेरी निष्फळ
जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील पिंपरवाडी, आंबे, हातवीज ही जंगल क्षेत्रात वसलेली गावे आहेत. या परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे ढाकोबा परिसरात दरवर्षी गवे येतात असे वृध्द नागरिक सांगतात, मात्र यावेळी प्रत्यक्ष गव्याचे दर्शन झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
गव्यांच्या या दर्शनाने लोकांमध्ये चर्चेला उधान आले आहे. हे गवे भिमाशंकर अभयारण्यामधून आले असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( DRDO ) मध्ये विविध पदांसाठी भरती