Sunday, December 8, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : मोदी विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका

मोठी बातमी : मोदी विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेससहित १४ विरोधी पक्षांना मोठा दणका दिला आहे. देशातल्या १४ विरोधी पक्षांनी मिळून ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांच्या विरोधात एक याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा विरोधीपक्षांना मोठा धक्का बदला आहे.

देशातील स्वायंत्त असलेल्या ईडी व सीबीआय या तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. विरोधी नेत्यांना अटक, रिमांड आणि जामीन यावर नियंत्रण ठेवणाऱ्या मार्गदर्शक तत्वांची मागणीही विरोधकांनी केली होती. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 14 विरोधी पक्षांनी दाखल केलेले ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

ईडी व सीबीआय या तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना सातत्याने लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. काँग्रेस, आप, डीएमके, आरजेडी, बीआरएस, टीएमसी यांच्यासह १४ राजकीय पक्षांचा यामध्ये समावेश आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय