Friday, December 6, 2024
Homeआरोग्यकोरोनाजम्बो कोव्हिडं सेंटर बंद करून आयुक्तांनी सर्वाना नोकरीतून कमी केले

जम्बो कोव्हिडं सेंटर बंद करून आयुक्तांनी सर्वाना नोकरीतून कमी केले

पिंपरी चिंचवड : पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील ऑटोक्लस्टर जम्बो कोविड सेंटर फक्त रुग्ण नसल्याचे कारण सांगून कोविड सेंटर बंद करत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या कोविड सेंटर मधील जवळपास दीड – दोनशे जणांवर अचानकपणे बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. 

“स्पर्श” या संस्थेकडून हे 200 बेड्सचे कोविड सेंटर चालवले जात होते, मात्र स्पर्श बाबत अनेक तक्रारी येत असल्याने आयुक्तांनी स्पर्श सोबत केलेला करार अखेर खंडित केला.

मात्र, कोविडं सेंटर बंद करण्याआधी तेथील डॉक्टर्स आणि इतर कर्मचा-यांच्या सेवे बद्दल महापालिकेन काहीच नियोजन केले नाही. असे असतांना कुठलीही नोटीस न देताच कामावरून काढून टाकल्याने, संतप्त झालेल्या या कर्मचारी आणि डॉक्टर्सनी आता कोविड सेंटर बाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केल आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय