Wednesday, November 6, 2024
Homeताज्या बातम्यावंचित बहुजन आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले 'गॅस सिलेंडर'

वंचित बहुजन आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले ‘गॅस सिलेंडर’

मुंबई : अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) अखेर त्यांच्या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह प्राप्त झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पक्षाला ‘गॅस सिलेंडर’ हे चिन्ह दिले आहे. पक्षाला या संदर्भातील अधिकृत पत्र निवडणूक आयोगाच्या सचिवालयाकडून नुकतेच प्राप्त झाले आहे, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला राज्यभरात आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकाच चिन्हावर लढण्याची संधी मिळाली आहे.

गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळाल्यामुळे पक्षाच्या निवडणूक लढविण्याच्या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता येणार आहे. यामुळे उमेदवारांना आणि मतदारांना पक्षाशी जोडण्यामध्ये सोयीस्करता आणि एकात्मता येईल. पक्षाने सोशल मीडियावर या नवीन चिन्हाबाबत माहिती दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) त्यांच्या एक्स (पूर्वी ट्विटर) हँडलवरून पोस्ट शेअर करत सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.

Vanchit Bahujan Aghadi

वंचित बहुजन आघाडी मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सक्रीय आहे. यद्याप पक्षाची कामगिरी तितकीशी समाधानकारक ठरली नसली तरी, पक्षाने आपला विशिष्ट मतदार गट कायम ठेवला आहे. मात्र, निवडणूक चिन्हाच्या अभावामुळे पक्षाला प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या चिन्हांवर उमेदवार उभे करावे लागत होते, त्यामुळे एकात्मता राखणे कठीण होते.

आता केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाला एकत्रित चिन्ह दिल्याने वंचित बहुजन आघाडीची निवडणूक मोहिम अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयामुळे नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका लांबणीवर, वाचा काय आहे कारण !

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

संबंधित लेख

लोकप्रिय