Wednesday, September 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडविकत घेणारे तयार आहेत, विकत देणारे सत्तेत आहेत; त्यामुळे खाजगीकरण मूळावर आले...

विकत घेणारे तयार आहेत, विकत देणारे सत्तेत आहेत; त्यामुळे खाजगीकरण मूळावर आले – अ‍ॅड. मोहन वाडेकर

पुणे : खडकी येथील संरक्षण उत्पादन उद्योगातील ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉयीज युनियन संलग्न एम टी एस एस डी वर्कर्स युनियन (MTSSD WORKER  UNION ) सेंट्रल ए एफ व्ही डेपोचा 74 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 10 जानेवारी 1948 रोजी देशभरातील संरक्षण उद्योगातील कामगारांची संघटना स्थापन करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि उपाध्यक्ष, महात्मा फुले समता प्रतिष्ठान, अध्यक्ष बांधकाम मजदूर सभा ऍड.मोहन वाडेकर म्हणाले की, डिफेन्स उत्पादन कामगारांनी देशाच्या संरक्षणासाठी सैन्यदलाना लष्करी गणवेश, बूट, रायफलस, दारुगोळा, मॅक्सझीन, लष्करी वाहने, रणगाडा सह विमानाचे उत्पादन करून ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याची मोठी परंपरा या कामगारांमध्ये आहे. समाजवादी, प्रागतिक, डाव्या विचारांच्या नेत्यांनी संघटना वाढीसाठी त्याग केलेला आहे. अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. 

हेही वाचा ! आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याचा डॉ. अजित नवले यांचा आरोप, …अन्यथा तीव्र आंदोलन

देशातील विद्यमान खाजगीकरण, उदारीकरण नीती बद्दल अ‍ॅड.मोहन वाडेकर म्हणाले की, कार्पोरेट उद्योगांना सरकारी उद्योग कवडीमोलाने विकले जात आहेत. इथे विकत घेणारे तयार आहेत. संरक्षण उत्पादन क्षेत्र खाजगी उद्योगपतींना सरकार देत आहे. येथील उत्पादने आउट सोर्सिंग करून सरकार स्वयंपूर्ण संरक्षण नीतीला तिलांजली देत आहे. 

देशातील दारुगोळा फॅक्टरी, डेपो, रणगाडा रखरखाव, व्हेईकल्स पासून विमान उत्पादने खाजगी आणि कंत्राटी पद्धतीने देण्याचे धोरण देशहिताचे ठरणार नाही. आज सीमेवर चीन पाकिस्तान आहे. युद्धजन्य परिस्थितीत अहोरात्र काम करून सैन्यदलाला रसद पोचवणाऱ्या कामगारांनी सरकारच्या या खाजगीकरण धोरणा विरोधात संघर्ष केला पाहिजे. या देशातील विविध लढे महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने अहिँसक मार्गाने लढवले गेले आहेत.

हेही वाचा ! पुणे : उद्यापासून किसान सभेचे जुन्नर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करून ते म्हणाले की, जगाच्या इतिहासात लोकशाही मार्गाने निवडून दिलेला हुकूमशहा शेतकऱ्यांनी नमवला आहे. आता अर्थवादात अडकून न राहता कार्पोरेट धार्जिणे कामगार कायदे रद्द करण्यासाठी पुन्हा आंदोलनात उतरले पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड सलीम सैयद होते.

निकोप समाज घडवण्यासाठी सर्वांनी काम करूयात – अ‍ॅड.मनीषा महाजन

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटिका अ‍ॅड.मनीषा महाजन यांनी वर्धापन दिनास शुभेच्छा दिल्या,त्या म्हणाल्या की, संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कर्तव्य आणि त्यासोबत विवेक जागृत ठेवल्यास अंधश्रद्धा दूर होतील.

हेही वाचा ! केरळमधील एसएफआय कार्यकर्ता कॉ.धीरज यांच्या हत्येचा नांदगाव खंडेश्वरमध्ये निषेध !

महाजन पुढे बोलताना म्हणाल्या की, खडकी येथील संरक्षण उत्पादन कामगारांच्या ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन (MTSSD) च्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख वक्त्या अ‍ॅड.मनीषा महाजन यांनी संबोधन केले.

त्यांनी संघटनेच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, कामगारांच्या हक्काची लढाई विवेकाने लढली पाहिजे. संविधानाने विवेक शिकवला आहे. विवेकाचा जागर करण्याचे काम डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी केले, विवेकशून्य लोकांनी त्याची हत्या केली. येथील कार्यक्रमात दाभोळकरांनी काही वर्षापूर्वी मार्गदर्शन केले होते, त्यामुळे तुमच्या वर्धापन दिनाला सदिच्छा देताना मला आनंद होत आहे.

हेही वाचा ! राज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा

या आधुनिक विज्ञान युगात कामगार वर्गामध्ये विविध समस्या  आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी लोक बुवा, बाबा, ताई, अम्मा, मांत्रिक सत्संगमध्ये पर्याय शोधत आहेत. आपल्या खांद्यावर आपले डोके आहे, त्यामध्ये मेंदू आहे, त्याचा वापर करून अशा भोंदू लोकांच्या फसवणुकीपासून आपण सावध झाले पाहिजे, तसेच विवेकपूर्ण वर्तन केले पाहिजे.

तसेच आजही जात पंचायतीच्या माध्यमातून समाजाचे शोषण होत आहे. त्याने वाड्याच्या नावाखाली त्या समाजातील पंचांकडून दंड वसूल केला जात आहे. तसेच एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकणे, बहिष्कार करणे असे फर्मान काढले जातात, क्रूर व आघोरिशिक्षा दिली जाते आणि ते पूर्ण कुटुंब तणावाखाली समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमात सामील होऊ शकत नाही. अशा अन्यायाच्या विरुद्ध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाठपुरावा करून महाराष्ट्र सरकारकडून सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा 2017 साली पारित करून घेतला आहे. 

हेही वाचा ! खेड प्रस्तावित विमानतळासाठी सर्व पक्ष एकवटले, आजी – माजी आमदार व नागरिक काय म्हणाले पहा !

सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा व जादूटोणाविरोधी कायदा या दोन्ही कायद्याचे समाजामध्ये जागृती करणे तसेच समाज एकसंघ राहून व्हावा यासाठी भारतीय संविधानाचे महत्व, आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांसाठी मदत, तसेच वर्षभर अन्य भरपूर उपक्रम राबवून एक चांगला निकोप समाज घडवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सतत कार्यरत असते, असेही महाजन म्हणाल्या.

या कार्यक्रमास कॉम्रेड मोहन होळ, कॉम्रेड सचिन कांबळे, फिरोज सैयद, कॉम्रेड राजेंद्र घुले आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश भिंताडे यांनी केले, सूत्रसंचालन किरण ननावरे तर आभारप्रदर्शन सचिन चावरे यांनी केले

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय