Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडाविश्वइंडियन प्रीमियर लीगच्या IPL 15 व्या पर्वाचा बिगुल आज मुंबईत वाजणार !

इंडियन प्रीमियर लीगच्या IPL 15 व्या पर्वाचा बिगुल आज मुंबईत वाजणार !

मुंबई:  इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या पर्वाचा बिगुल आज शनिवार, 26 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर वाजणार आहे.गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात 7.30 वाजता उद्घाटनाच्या लढतीला प्रारंभ होणार आहे. 2011 नंतर प्रथमच यंदाच्या आयपीएलमध्ये 1इंडियन प्रीमियर लीगच्या IPL 15 व्या पर्वाचा बिगुल आज मुंबईत वाजणार ! 

संघ कौशल्य पणाला लावण्यासाठी जय्यत मोर्चेबांधणी करून मैदानावर उतरण्यासाठी सज्ज आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आलेली कडक नियमावली… नव्या नियमामुळे वाढलेली रंगत… आणि टी-20 वर्ल्ड कपपूर्वीची रंगीत तालीम. आदी कारणांमुळे मायदेशात होणारा आयपीएलचा 15 वा हंगाम खऱया अर्थाने संस्मरणीय ठरणार आहे.

बँक ऑफ बडोदा मध्ये पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! भारतीय नौदलात 2500 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

यंदाच्या आयपीएलमध्ये लखनौ सुपरजायंट्स व गुजरात टायटन्स हे दोन नवे संघ पदार्पण करणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे 2019 नंतर प्रथमच प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन सामने बघता येणार आहेत. 

कोविड-19 च्या धसक्यामुळे मोठी रिस्क घ्यायला कोणीही तयार नसून 25 टक्के प्रेक्षकांना मैदानावर येण्यास परवानगी देण्यात आली आहे. दोन नव्या संघांची भर पडल्यामुळे आयपीएलमधील सामन्यांची संख्या 60 वरून 74 झाली आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे.

१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय