Wednesday, April 24, 2024
Homeग्रामीण'फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ मॅथेमॅटिक्स' या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न

‘फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ मॅथेमॅटिक्स’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न

जुन्नर / आनंद कांबळे : फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ मॅथेमॅटिक्स या पुस्तकाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

ओतुर येथील अण्णासाहेब वाघिरे कॉलेज येथे उच्च माध्यमिक, चैतन्य विद्यालय ओतूर येथे शालेय शिक्षण घेतलेला व सध्या तोलानी मरीटाईम इन्स्टिट्यूट तळेगाव येथे प्रथम वर्ष मरिन इंजिनीरिंग मध्ये शिकत असलेला विद्यार्थी कुमार शिवम सुशील पालीवाल पुस्तक लिहिले आहे. अकरावी व बारावी सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी ‘फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ मॅथेमॅटिक्स’ हे पुस्तक समजेल अशा सोप्या भाषेत व विद्यार्थ्यांचा गणिताबद्दलचा न्यूनगंड दूर होईल अशा पद्धतीने लिहिले आहे.

सदर पुस्तकाचे प्रकाशन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते जुन्नर येथे करण्यात आले 

यावेळी खासदार अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी शिवम पालीवाल या विद्यार्थ्यांचे कौतुक करून मरीन इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी गणितासारख्या विषयातील संज्ञा सोप्या करून पुस्तकातून मांडतो हे पाहून तालुक्यातील तरूणाईचा अभिमान वाटतो असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

गणित हा विषय किचकट असून त्यातील बेसिक फंडामेंटल समजल्यास तो विषय खूप सोपा वाटतो आणि ते फंडामेंटल कन्सेप्ट शिवम पालीवाल ने त्याच्या पुस्तकातून मांडलेले आहेत याचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना होईल असे मत आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.

श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ओतूर या संस्थेमध्ये कार्यरत असलेले सुशील पालीवाल यांचा शिवम हा मुलगा असून संस्थेचे अध्यक्ष व पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक विशाल तांबे व संस्थेचे सचिव वैभव तांबे यांनी शिवम चे अभिनंदन केले व त्याला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय