Thursday, July 18, 2024
Homeराज्यभोसरी येथे होणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत

भोसरी येथे होणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत– भोसरीच्या बैलागाडा आखाड्यात घुमणार ‘भिर्रर्र’चा आवाज !


– ग्रामदैवत भैरवनाथ उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यंतीचे आयोजन


– पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष अशोक लांडगे यांची माहिती


पिंपरी चिंचवड : भोसरीगावचे ग्रामदैवत श्री.भैरवनाथ महाराज जत्रेनिमित्त प्रतिवर्षी उरुस भरतो. गेल्या दोन वर्षांत कोविडच्या परिस्थितीमुळे उत्सव झाला नाही. मात्र, यावर्षी निर्बंध हटवल्यामुळे उत्सव थाटा-माटात पार पडला. बैलगाडा शर्यतींवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवल्यानंतर सर्वत्र बैलगाडा शर्यती होत आहे. आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी जाधववाडी येथे 28 मे ते 31 मे रोजी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. ही देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत होणार आहेत. त्यामुळे गावकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

बैलगाडा शर्यंतीचे उदघाटन २८ मे ला सकाळी सात वाजता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे. दुसऱ्या दिवशी माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत आणि विधानपरिषद सदस्य गोपींचद पडळकर, तर तिसऱ्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

बक्षीस वितरण माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या नंबराच्या बैलगाड्याच्या मालकाला १५ लाख रुपये रोख आणि एक बोलेरो जीप ईनाम आहे. या बैलगाडा शर्यतीत तीन चारचाकी आणि १०३ दुचाकी, २२ तोळे सोने, दहा चांदीच्या गदा यासह लाखो रुपयांच्या रोख बक्षीसे ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत दीड हजार बैलगाडे त्यात भाग घेणार असून ती पाहण्यासाठी अंदाजे दीड लाख शौकीन येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शर्यतीच्या यानिमित्त बैलांचा रॅम्प वॉकही आयोजित करण्यात आला आहे. 

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय