Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मंदिरातील आरती ठरली शेवटची; पारसच्या दुर्घटनेत ७ लोकांचा मृत्यू, सरकारकडून मदत जाहीर

अकोला : शहरातील पारस परिसरातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच टिनशेडवर झाड कोसळून आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे हे झाड कोसळलं आणि टिनशेडखाली थांबलेले 40 ते 50 जण दबले गेले.

या घटनेत आतापर्यंत ७ लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर काही लोकांना सुखरूप बाहेर काढून वाचवण्यात आले आहे. यातील काही लोकांना हात-पायाला गंभीर दुखापत झाली असून जखमींचा आकडा २५ आहे.

यापैकी पाच जण गंभीर जखमी असल्याचे समजते. या सर्व जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे त्यासह शोध बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं होते.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles