Tuesday, March 18, 2025

29 वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन कोरोना महामारीमुळे ढकलले पुढे

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

कळवण / सुशिल कुवर : आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या प्रतापगड येथे दि. १३ – १४ – १५ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या महासंमेलनाबाबत आदिवासी एकता परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज दि. ११ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता प्रतापगड मध्ये आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये महासंमेलन संबंधित सर्व बाबींवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. आदिवासी एकता परिषदेची जागतिक दृष्टी आणि निसर्गाशी संवाद साधणारी आहे.

त्यामुळे कोरोना साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन मानव, समाज आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने आदिवासी एकता परिषदेचे 29 वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन कोरोना साथीची भीषण परिस्थिती सामान्य होईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

हेही वाचा ! आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याचा डॉ. अजित नवले यांचा आरोप, …अन्यथा तीव्र आंदोलन

आगामी काळात जेव्हा कोरोना साथीची परिस्थिती सामान्य होईल तेव्हा हे महासंमेलन राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातच होणार आहे. 29 वे आदिवासी एकता महासंमेलन विषयी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन लवकरच या महासंमेलनची नवीन तारीख जाहीर केली जाईल.

हेही वाचा ! पुणे : जुन्नर तालुक्यामध्ये रोजगार हमी योजना कायद्याची अंमलबजावणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन

हेही वाचा ! नाशिक चलन नोट प्रेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४९ जागा

Related Articles

- Advertisement -

Latest Articles