ठाणे : मुरबाड तालुक्यातील आदिवासी वनपट्टे धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी बिरसा फायटर्स च्या वतीने मुरबाड तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुरबाड तालुक्यातील आदिवासी वनपट्टे धारक शेतकऱ्याला गेली चार ते पाच वर्षे कोणत्याही प्रकारची शेती नुकसान भरपाई मिळाली नाही. या वर्षी झालेल्या शेतीची नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बिरसा फायटर्स संघटनेचे कोकण विभाग प्रमुख / अध्यक्ष राजाभाऊ सरनोबत, बाळीबाई मुकणे, शालुबाई वाघे, य़ंशवत मुकणे, दशरथ,बगऴे, सावन वाघे, राजुबाई मिनावाघे, नवसी वाघे आदीसह उपस्थित होते.