Tuesday, January 14, 2025
HomeNewsठाणे : आशा व गटप्रवर्तकांची सरकारच्या विरोधात निदर्शने

ठाणे : आशा व गटप्रवर्तकांची सरकारच्या विरोधात निदर्शने

ठाणे, दि. १७ : ठाणे-पालघर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन (सीटू संलग्न) वतीने सरकारच्या विरोधात निदर्शने केली. आशा व गटप्रवर्तकांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू आहे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आशा गटप्रवर्तकांंना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, किमान वेतन लागू करा, कोव्हीड काळात करण्यात येणाऱ्या कामाचा प्रतिदिन ५०० रुपये भत्ता द्या यासह अन्य मागण्या करण्यात आल्या.

आशा व गटप्रवर्तक युनियनच्या संगीता प्रजापती आणि गीता माने यांच्या पुढाकाराने निदर्शने केली. या निदर्शनाला माकप तालुका सचिव कॉ पी. के. लाली, जि. स. सदस्य कॉ. सुनिल चव्हाण व SFI केंद्रीय समिती सदस्या कविता वरे यांनी संबोधित केले. यावेळी मोठ्या संख्येने आशा सहभागी झाल्या होत्या.

संबंधित लेख

लोकप्रिय