Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडठाणे - बदलापूर शहर पुराच्या पाण्यात, परिस्थिती गंभीर

ठाणे – बदलापूर शहर पुराच्या पाण्यात, परिस्थिती गंभीर

बदलापूर : बदलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील बदलापूर गावाकडे जाणार उल्हास नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर बदलापूर – कर्जत रास्ता देखील पाण्याखाली आला होता. त्यामुळे हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. बदलापूर वांगणी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली आल्याने कर्जत आणि मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

रात्री बारा वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत शहरात मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण बदलापूर शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.. तर उल्हास नदीच्या काठावर असलेल्या वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरले होते. अनेक गृहसंकुलातील तळ मजले पाण्याखाली गेले आहेत. उल्हास नदीवरील बदलापूर गावाकडे जाणारा पूल आणि वालिवली गावाकडे जाणाऱ्या पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने हे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले.

शहरातील अनेक मोठे नाले देखील भरून वाहत असल्याने शहराच्या अंतर्गत भागात देखील नागरिकांना पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात देखील पाणी गेल्याने या ठिकाणची यंत्रणा बंद करावी लागली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय