Wednesday, March 12, 2025

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांकडून ट्रेन हायजॅक, 120 प्रवासी ओलीस

Pakistan Train Hijack : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात मोठा थरार घडला असून, दहशतवाद्यांनी संपूर्ण जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) या दहशतवादी संघटनेने बोलान परिसरात ही ट्रेन ताब्यात घेतली असून, तब्बल 120 हून अधिक प्रवासी ओलीस ठेवले आहेत. सुरक्षा दलांनी लष्करी कारवाई केल्यास सर्व प्रवाशांना ठार मारण्याचा इशारा दहशतवाद्यांनी दिला आहे.

6 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू (Pakistan Train Hijack)

मिळालेल्या माहितीनुसार, BLA ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी मश्काफ, धादर आणि बोलान परिसरात सुनियोजित हल्ला केला असल्याचे सांगितले आहे. दहशतवाद्यांनी आधी रेल्वे ट्रॅक उडवले, त्यामुळे जाफर एक्सप्रेस अचानक थांबली आणि त्यानंतर सशस्त्र दहशतवाद्यांनी संपूर्ण ट्रेन ताब्यात घेतली. या हल्ल्यात आतापर्यंत 6 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

BLA चा इशारा – “आमच्यावर हल्ला केल्यास प्रवाशांचे जीव धोक्यात”

BLA च्या दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकारला इशारा दिला आहे की, “जर पाकिस्तानी लष्कराने आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही सर्व प्रवाशांना ठार मारू. या संपूर्ण घटनेची जबाबदारी पाकिस्तानी लष्करावर असेल.” त्यामुळे या प्रकरणामुळे पाकिस्तानच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यापूर्वीही जाफर एक्सप्रेसवर हल्ला

यापूर्वीही जाफर एक्सप्रेसवर दहशतवादी हल्ले झाले आहेत. 16 फेब्रुवारी 2023 रोजीही या ट्रेनमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला होता. पेशावरहून क्वेट्टाला जात असताना चिचावतनी रेल्वे स्थानकाजवळ हा स्फोट झाला होता, ज्यात 2 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने स्वीकारली होती.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

हे ही वाचा :

मोठी बातमी : शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस जारी, वाचा काय आहे प्रकरण !

संतापजनक : मद्यधुंद तरुणाचे सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल

राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा खूलासा

मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा

महिलांसाठी खूशखबर : जागतिक महिला दिनानिमित्त पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत

Related Articles

- Advertisement -

Latest Articles