Monday, July 15, 2024
Homeराष्ट्रीयश्रीनगरमध्ये पोलीस व्हॅन वर दहशतवादी हल्ला

श्रीनगरमध्ये पोलीस व्हॅन वर दहशतवादी हल्ला

श्रीनगर : श्रीनगरमधील जेवन येथील पंथा चौक परिसरात सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर मोठा हल्ला केला. पोलिसांच्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला असून त्यात १४ जवान जखमी झालेत. सर्व जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. 

या दहशतवादी हल्ल्यापूर्वी आज श्रीनगरच्या बाहेरील दुसऱ्या एका घटनेत सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या बाहेरील भागात सोमवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले. रंगरेथ भागात ही चकमक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय