पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:केंद्राच्या बजेटम गरीब बेरोजगार तमाम सामान्य जनतेची केलेली चेष्टा आहे.वाढत्या महागाईमुळेअंगमेहनती,रोजंदारी,कंत्राटी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा अर्थसंकल्पात नाही.महागाई मध्ये दिलासा द्यावा अशी आर्थिक कल्याणकारी योजना बजेट मध्ये असावी अशा सूचना आमदार,खासदार लोकप्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांना दिलेला नाही.हे बजेट आम आदमीचे कसे?सरकार समर्थकांनी याचे उत्तर द्यावे.
डिजिटल क्रांतीच्या या युगात वाड्यावस्त्यावर आरोग्य सुविधा नाहीत.ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा शेवटच्या घटका मोजत आहेत.सरकारने फक्त एक वर्षभर मोफत गहू तांदूळ दिले आहेत,तेल,साखर,डाळी साठी अनुदान असेल तर शोधून दाखवा.अशी प्रतिक्रिया येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भ्रष्टाचार निर्मूलन समिती,महाराष्ट्रचे उपाध्यक्ष शांताराम खुडे यांनी दिली आहे.
सर्व सामान्य जनतेला बजेट मध्ये फक्त एक वर्षभर गहू तांदूळ दुसरे काय मिळाले ते सांगा?-शांताराम खुडे
- Advertisement -