हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपलं राजकीय अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी संपूर्ण लक्ष महाराष्ट्रावर केंद्रीत केलं आहे. आता पर्यंत राज्यातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. असे असताना आता के. चंद्रशेखर राव आज आपल्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांसह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव थोड्याच वेळात तेलंगणातून महाराष्ट्राकडे यायला निघणार आहेत. त्यांचं अख्ख मंत्रिमंडळच महाराष्ट्रात येणार आहे. ते तीनशे गाड्यांच्या ताफ्यासह सोलापूरला येणार आहेत. ते उद्या पंढरपूरला जाऊन विठ्ठालाचं दर्शन घेणार आहेत. या निमित्ताने चंद्रशेखर राव राज्यात मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चंद्रशेखर राव पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा करणार आहेत. यावेळी विठ्ठलावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत. विठ्ठल मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यासाठी विशेष तयारी देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, सरकोली येथे बीआरएस पक्षाचा शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा :
कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत नवीन अपडेट, आता रस्त्यावर लढाई न लढता थेट…
विशेष लेख : आधुनिक विचारधारेचा लोकराजा राजश्री शाहू महाराज !
Rainy season : पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे
सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदाची भरती, आजच अर्ज करा
NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती
IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांची भरती
BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती