Telangana Dogs : एडुमैलाराम गावात अज्ञात व्यक्तींनी 32 कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधून 40 फूट उंच पुलावरून फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या क्रूर कृत्यात 20 कुत्र्यांचा मृत्यू झाला असून 11 कुत्र्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
‘सिटिझन फॉर अॅनिमल्स’च्या स्वयंसेवकांनी 4 जानेवारी रोजी घटनास्थळी भेट दिल्यानंतर ही घटना समोर आली आहे. स्वयंसेवकांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांना कुजलेले मृतदेह आणि गंभीर जखमी कुत्रे असे भयावह दृश्य दिसून आले. काही कुत्रे मृतदेहांच्या ढिगाऱ्यात अडकलेले होते. ‘अॅनिमल वॉरियर्स कन्झर्वेशन सोसायटी’ आणि ‘पीपल फॉर अॅनिमल्स हैदराबाद’ यांच्या मदतीने ११ जखमी कुत्र्यांना वाचवण्यात आले आणि त्यांना नागोळे येथील निवारा केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले.
‘सिटिझन फॉर अॅनिमल्स’च्या तक्रारीनंतर इंद्रकरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या अमानुष घटनेचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. (Telangana Dogs)
दरम्यान, आरोपींनी पाय आणि तोंड बांधून कुत्र्यांना जाणीवपूर्वक पुलावरून फेकले असल्याची माहिती मिळत आहे. हे कृत्य पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांचा संशय आहे, मात्र या मागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.
हे ही वाचा :
चोरी करायला गेला अन् महिलेचा मुका घेऊन आला, आरोपी अटकेत
आळंदीच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार
दिल्ली विधानसभा निवडणूकीची घोषणा, वाचा कधी होणार मतदान
52 वर्षीय गोली श्यामला यांचा 150 किमी समुद्रात पोहण्याचा विक्रम
मोठी बातमी : HMPV व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव, दोन मुलांना संसर्ग
मोठी बातमी : लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये ; सरकारकडून मोठी घोषणा
ओयो हॉटेल्सकडून नवी चेक-इन धोरण ; अविवाहित जोडपी अडचणीत ?