Monday, July 15, 2024
Homeजिल्हातहसीलदार कार्यालयाची वीज कापली, तहसीलदारांनी केले महावितरणचे कार्यालय सील

तहसीलदार कार्यालयाची वीज कापली, तहसीलदारांनी केले महावितरणचे कार्यालय सील

नंदुरबार : थकीत वीज बिलाची रक्कम भरत नाही म्हणून महावितरण अधिकाऱ्यांनी थेट नंदुरबार तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला. मात्र संतप्त तहसीलदारांनी महसुलाची थकबाकी भरत नाही म्हणून महावितरणचे कार्यालय सील करीत महावितरणलाच धक्का दिला आहे. सरकारच्या या दोन खात्यामधील वादाची चर्चा नंदुरबार शहरात सुरू आहे.

शेवटी या दोघांमधला वाद पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. महावितरणच्या कार्यकारी उपअभियंता मनीषा कोठारी थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम चालवली आहे. थकबाकीदारांवर गुन्हे देखील दाखल केले जात आहेत.

तहसीलदारांनी वीज वितरणची महसूल थकबाकी वसूल करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. वीज वितरणच्या या कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. 

दरम्यान संतप्त कार्यकारी अभियंता पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी आणि कर्मचारी यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिस ठाणे गाठले. तसेच तहसीलदार भाऊसाहेब थोरातांनी महावितरणच्या सर्व कार्यालयांची थकबाकी वसूल करण्यासाठी धडक मोहीम राबवण्याचा इशारा देत गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय