Tuesday, January 14, 2025
HomeNewsतहसीलदार ज्योती देवरे ऑडिओ क्लिप प्रकरणी तहसीलदार संघटना आक्रमक

तहसीलदार ज्योती देवरे ऑडिओ क्लिप प्रकरणी तहसीलदार संघटना आक्रमक

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्धच्या अहवालासंबंधी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने गंभीर आरोप केला आहे. हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकून तयार केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य स्तरावरून वरिष्ठ महिला अधिकाऱ्यामार्फत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

क्षेत्रीय स्तरावर लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली महिला अधिकाऱ्यांची कुचंबणा करण्याचे प्रकार झाल्यास महिला अधिकाऱ्यांचे करिअर संपून जाईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज ( लि। २३) संघटनेतर्फे राज्यभर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात येणार आहे.

– रफिक शेख 

संबंधित लेख

लोकप्रिय