Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाविश्वब्रेकिंग : टीम इंडियाला मोठा धक्का, भारत इंग्लंड सामन्यापूर्वीच “या” खेळाडूला कोरोनाची...

ब्रेकिंग : टीम इंडियाला मोठा धक्का, भारत इंग्लंड सामन्यापूर्वीच “या” खेळाडूला कोरोनाची लागण

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना 1 जुलैपासून सुरू होणार होत आहे, मात्र या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे.

भारत इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. 1 जुलैपासून या सामन्याला सुरूवात होणार आहे, अशात टीम इंडियाचा संघनायक रोहित शर्मा हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. शनिवारी २५ जून रोजी करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा सध्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. सध्या भारतीय संघाची मेडिकल टीम त्याची काळजी घेत आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीत रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळल असल्याची माहिती बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय