Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

व्हिडिओ : पत्नीला खांद्यावर घेत नरहरी झिरवाळ यांनी धरला ठेका; हळदीच्या कार्यक्रमातील व्हिडिओ तुफान व्हायरल

नाशिक प्रतिनिधी, सुशिल कुवर :  विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ हे त्यांच्या साधेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. आदिवासी बांधवांचे प्रतिनिधीत्व करणारे झिरवाळ हे सर्वसामान्यांना आपलेसे वाटतात. कारण, त्यांचा साधाभोळा स्वभाव आणि राहणीमान. कुठलाही बडेजाव नाही. क्षणार्धात ते अनेकांमध्ये मिसळून जातात. सध्या त्यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. तो म्हणजे, आपल्याच नात्यातील हळदीच्या कार्यक्रमाला झिरवाळ हे सपत्नीक हजर राहिले. आणि मग, काय त्यांनी पत्नीला थेट खाद्यावर घेत ठेका धरला.

अनेक लोकप्रतिनिधी लोकांमधूनच निवडून जातात. मात्र एकदा त्यांना मुंबई-दिल्लीची हवा लागली की त्यांचे जमिनीवर पायाच टिकत नाहीत. त्यांचा औरा काही औरच असतो. आणि ते जनसामान्यांमध्ये इंग्लिश साहेब व्हायचा प्रयत्न करतात. मात्र याच्या अगदी उलट असे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ. त्यांची नाळ अजूनही आपल्या मातीशी जुळलीय. ते आतापर्यंत अनेकदा लोकांना दिसत आले आहे. पुन्हा एकदा त्यांची अशीच चर्चा सुरू झाली आहे. एका लग्नसमारंभात त्यांनी आपल्या पत्नीला खांद्यावर उचलून घेत फेमस संबळ वाद्याच्या तालावर ठेका धरला आहे. त्यांच्या या अनोख्या नृत्याचा व्हडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याची सर्वदूर चर्चा होत आहे.

सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. लग्न घरात उत्सवाचे वातावरण असते. लग्नाला आलेले पाहुणे मंडळींसह सारेच आनंद साजरा करतात. गाण्यांवर ठेका धरत नृत्य करतात. असाच काहीसा प्रकार उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नातेवाईकाच्या हळदी समारंभात घडला. संबळ या वाद्याच्या तालावर खुद्द नरहरी झिरवाळ यांनी अनोख्या स्टाईलने ठेका धरला. आपल्या पत्नीला त्यांनी खांद्यावर बसवून संबळच्या तालावर नृत्य केले. आदिवासी भागातील हे अतिशय प्रसिद्ध नृत्य आहे. हे पाहून सर्वच अवाक झाले.

बघा, त्यांच्या या नृत्याचा हा व्हिडिओ

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles