Tuesday, March 18, 2025

युक्रेनच्या वृद्ध महिलेेने रशियन सैनिकाला भर चौकात झापले, म्हणाली…!

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

युक्रेन : “या सूर्यफुलाच्या बिया घ्या आणि तुमच्या खिशात ठेवा म्हणजे उद्या तुम्ही युद्धात मेला तर तिथे सूर्यफुलांची झाडे उगवतील !” असे रोमहर्षक उदगार युक्रेनच्या एका महिलेने तिच्या प्रांतावर आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्यातील एका सैनिकाला म्हटले आहे. त्या महिलेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तिच्या या धैर्याचे युक्रेन मधूनच नव्हे तर संपूर्ण जगातून कौतुक होत आहे.

तर ५ लाख किलोचे स्पेस स्टेशन चीन किंवा भारतावर पाडायचे का? रशियाचा अमेरिकेला इशारा

इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

रशियाने युक्रेनच्या आर्मी बेस वरती हल्ला केला आहे. युक्रेनच्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून बंकर मध्ये लपून बसावे लागत आहे. युक्रेनमधील एका महिलेच्या घराशेजारी जेव्हा रशियातील सैनिकांनी आक्रमण केले तेव्हा तेथील महिला हातामध्ये सूर्यफुलाच्या बिया घेऊन त्या सैनिकाला धाडसाने सामोरे गेली. आणि त्याला म्हणाली “सूर्यफुलाच्या बिया तुझ्या पॉकेट मध्ये ठेव जेणेकरून उद्या तू इथे मेलास तर त्या जागी सूर्य फुलांची झाडे उगवतील.”

युक्रेन देश सूर्यफुलाच्या तेलाचा सर्वात मोठा उत्पादक असून भारतातील 70 टक्के सूर्यफुलाचे तेल हे युक्रेनवरून आयात केले जाते.

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

पुणे : जुन्नरला सातवाहन कालीन मातीच्या भांड्याचे अवशेष आढळले

Related Articles

- Advertisement -

Latest Articles