Thursday, December 12, 2024
Homeआंतरराष्ट्रीयSyria Civil War : सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे देश सोडून पलायन

Syria Civil War : सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे देश सोडून पलायन

नवी दिल्ली / वर्षा चव्हाण : सीरिया नागरी युद्धाच्या ताज्या घडामोडींनुसार, सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद देश सोडून एका अज्ञात स्थळी पलायन केले आहेत. या घडामोडी रविवारी सकाळी घडल्या, ज्यात विद्रोही सैन्य गटाने दमास्कसची राजधानी ताब्यात घेतली. २०११ पासून सुरू असलेल्या सीरियाच्या नागरी युद्धात हा बशर अल-असदच्या सत्तेला सर्वात मोठा धक्का ठरला आहे. (Syria Civil War)

53 वर्षांची एक सत्ता संपुष्टात आली व सीरिया कोसळला. बंडखोर दमास्कसमध्ये घुसले असुन राष्ट्राध्यक्ष बशर अल असद देश सोडून रशियाला गेले आहेत.

असद कुटुंब ज्याने इंदिरा गांधींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत भारताचे डझनभर पंतप्रधान पाहिले. काश्मीर प्रश्नावर भारताला नेहमीच पाठिंबा दिला, सीरियाचे 1930 ते 1971 पर्यंत एकूण 18 राष्ट्राध्यक्ष झाले. देशात खुप खूप अस्थिरता होती. पण नंतर 1971 मध्ये हाफिज अल-असद यांची हुकूमशाही सुरू झाली. त्यांचा मुलगा बशर अल-असद 2000 पासून राष्ट्राध्यक्ष होता.

सदर घटनेवरून सीरियाच्या विरोधी गटांनी सांगितले की, त्यांनी दमास्कस शहरात प्रवेश केला आहे, आणि तिथे लष्कराचा कुठलाही ठसा दिसत नाही. “आम्ही सीरियाच्या लोकांसोबत आहोत, आम्ही आमचे कैदी मुक्त केले आहेत. आणि सेदनाया तुरुंगातील अन्यायपूर्ण डांबून ठेवलेले कैदी मुक्त केले आहेत” असे विरोधी गटाने म्हटले आहे. सेदनाया हा दमास्कसच्या बाहेरील एक मोठा लष्करी तुरुंग आहे, जिथे सरकारने हजारो लोकांना बंदी करून ठेवले होते. (Syria Civil War)

या वेगाने घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण प्रदेशात अस्वस्थता निर्माण झाली आहे. लेबनॉनने सीरियासोबत सर्व लँड सीमा बंद केल्या आहेत, शिवाय बैरुत आणि दमास्कसला जोडणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. जॉर्डनने देखील सीरिया सीमा बंद केली आहे.

काही प्रमुख देश आणि संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत सीरियातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी दोन तासांच्या बैठकीसाठी दोहा शिखर परिषदेत एकत्र आले. संयुक्त राष्ट्रांचे दूत जेनिव्हामध्ये तातडीने चर्चा सुरू करण्याची तयारी करत आहेत, जेणेकरून “राजकीय संक्रमण” सुरळीतपणे होईल.

तत्पूर्वी सीरिया मधील भारताचे नागरिक सुरक्षित असल्याचे दमास्कस येथील दूतावासाने
स्पष्ट केले आहे.

बंडखोरांनी सीरियातील ५ प्रमुख शहरांवर नियंत्रण मिळवले आहे. लोकांनी यांत राजधानी दमास्कस शहरासह अलेप्पो, हमा, होम्स आणि दारा सह संपूर्ण सीरियात लोक असद सरकार पडल्याचा आनंद साजरा करत आहेत. शहरातील प्रत्येक चौकात लोक जमावाने स्वातंत्र्याच्या घोषणा देत आहेत. बंडखोरांच्या कमांडरांनी राजकीय बंदीवानांची सुटका करण्याची घोषणा केली आहे.

Syria Civil War

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

पुणे येथे विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा होणार भरती

पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत भरती सुरू; आजच अर्ज करा !

संबंधित लेख

लोकप्रिय