Saturday, October 5, 2024
Homeताज्या बातम्याSwayam Yojana : या योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रूपये, वाचा काय...

Swayam Yojana : या योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रूपये, वाचा काय आहे पात्रता !

Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana : महाराष्ट्र शासनाने राज्यातील भटक्या जमाती क- प्रवर्गातील धनगर समाजातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना “पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना” राबविण्यास मान्यता दिली आहे.

पात्र विद्यार्थ्यांना किती लाभ मिळणार ?
या योजनेंर्तगत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी रु.38 हजार ते रु.60 हजार पर्यंत रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात येईल.

योजनेचे निकष/पात्रता :
ही योजना भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना लागू आहे.
या योजनेमध्ये विद्यार्थ्यांस इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण आवश्यक आहेत.
तसेच विद्यार्थी हा वसतिगृह प्रवेशास पात्र असावा.
विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
पालकाचे उत्पन्न रु. 2.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
विद्याथ्यांचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे.
विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करीत नसावा.
महाविद्यालयातील विद्याथ्यार्‍ची उपस्थिती किमान 75 टक्के असावी.
अर्ज सादर करावयाची मुदत व अर्ज कुठे सादर करावयाचा ?

शासनाने राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय/तंत्रनिकेतनांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागाच्या “स्वयम्” योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे.

त्यानुषंगाने शासनातर्फे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात “पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम्” योजना व “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार” योजनेंतर्गत अर्ज स्वीकृतीस दि.31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि उच्च शिक्षण विभागातील काही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याने विद्यार्थ्यांना विहित वेळेत अर्ज करण्यास शक्य न झाल्याने संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्याकडून अर्ज स्वीकृतीस मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

उच्च शिक्षणाच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख दि.3 सप्टेंबर 2024 असून याची निवड यादी दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केली जाणार आहे.

तर प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख दि.15 ऑक्टोबर 2024 असून याची निवड यादी दि.30 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केली जाणार आहे.
तरी, वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सहायक संचालक समाधान इंगळे यांनी केले आहे.

Swayam Yojana

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

मोठी बातमी : जय शाह बनणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे नवे अध्यक्ष

संबंधित लेख

लोकप्रिय