Saturday, April 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडतुम्ही दुर्बिणी लावा, भौतिक आणि रसायन शास्त्राच्या शाळा उभारा, असा क्रांतिकारी विचार...

तुम्ही दुर्बिणी लावा, भौतिक आणि रसायन शास्त्राच्या शाळा उभारा, असा क्रांतिकारी विचार स्वामी विवेकानंदांनी दिला – अवधूत गुरव

चिखली येथे विवेकानंद जयंतीनिमित्त व्याख्यानमाला

पिंपरी चिंचवड : स्वामी विवेकानंद हे संन्यास धर्मातील विद्वान होते. परतंत्र भारतात त्यांनी बंगाल, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश असा प्रवास करत दक्षिण भारतात संचार केला. ते कलाशाखेतील पदवीधर होते. पारतंत्र्य, दारिद्र्य, आणि दुष्काळ यामध्ये पिचलेल्या जन शक्तीला, सामान्य जनतेचा सांस्कृतिक, शैक्षणिक उध्दार करण्यासाठी त्यांनी प्रचारक म्हणून काम केले. शिक्षणातून सक्षम झाल्याशिवाय लोक समृद्ध जीवन जगू शकणार नाहीत, असे प्रतिपादन प्रा.अवधूत गुरव यांनी केले.

विवेकानंद जयंती निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत ज्ञान प्रबोधिनी प्रशाला  येथे  “युवकांसाठी विवेकानंद” या विषयावर बोलताना केले.

हेही वाचा ! धक्कादायक : जात पाहुन वकिलाला नाकारले घर

स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान, शरदनगर, चिंचवड प्राधिकरण यांचे वतीने स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विविध कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते रामराजे बेंबडे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

येथील हनुमान मंदिरात स्वामींची महती सांगताना अवधूत गुरव म्हणाले की, विवेकानंद यांनी वेद, पुराण, धर्म ग्रंथाचा अभ्यास केला. भगवी वस्त्रे परिधान करून वावरणाऱ्या साधू संताबद्दल त्यांना आकर्षण होते. देव आहे का ? की तो डोळे बंद केल्यावर दिसतो, असा प्रश्न त्यांना पडत होता. त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना सुरवातीला योग, अध्यात्म याचे मार्गदर्शन केले. तेहेतीस कोटी देवांच्या कल्पनेपेक्षा तेहेतीस कोटी भारतीय लोकांचे दारिद्र्य, मानसिक गुलामगिरी, युवकामधील नैराश्य, स्त्रियांचे विदारक जीवन पाहून ते बेचैन झाले. मनाची, बुद्धीची शुद्धी करण्यासाठी एक वस्त्र आणि एक भांडे घेऊन ते हिंदी भाषिक प्रदेशातून दक्षिण भारतात देशाटन करत राहिले. गरीबापासून ते राजे लोकांना भेटले.युरोप आणि ब्रिटिश राजवटीने शिक्षणाच्या बळावर आधुनिक प्रगती केली. त्यामुळे त्यांनी संस्थानिकांना दुर्बिणी लावलेल्या भौतिक आणि रसायन शास्त्राच्या शाळा उभारा असा क्रांतिकारी कार्यक्रम दिला, असेही ते म्हणाले.

हेही वाचा ! पिंपरी चिंचवड : राजमाता जिजाऊ यांना जयंतीदिनी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे अभिवादन !

बंधुगण उपाशी मरत आहेत, दुष्काळात काम करा

बंधुगण उपाशी मरत आहेत, दुष्काळात काम करा, असा संदेश 121 वर्षांपूर्वी भारतात पडलेल्या दुष्काळावर भाष्य करताना दिला. 

आपल्या बंधूगणांना उपाशीपोटी मरताना पाहून त्यांच्या जीवासाठी एक मूठ धान्य द्यावं असं त्यांना वाटत नाही. मात्र पशुपक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य देतात.अशा सभासमितीप्रती माझ्या मनात तसूभरही सहानुभूती नाही. अशा वागण्याने समाजाचं काही भलं होईल असं मला वाटत नाही.त्यामुळे युवकांनी पुन्हा एकदा स्वामी विवेकानंद यांचे विचार समजून घेतले पाहिजेत, असेही गुरव म्हणाले.

हेही वाचा ! रोजगार वाढल्याचे सांगून केंद्राने कष्टकरी कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले – काशिनाथ नखाते

विवेकानंद जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 52 लोकांनी सहभाग घेतला, आरोग्य चिकित्सा शिबिरात 110 तर 78 युवक युवतीचे कोव्हीड लसीकरण करण्यात आले.

प्रास्ताविक मिलिंद वेल्हाळ, सूत्रसंचालन संतोष ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सुनील पंडित, शंकर बनकर, महेश मांडवकर, पंढरीनाथ म्हस्के, संजय ढागरे अशोक हाडके, सुनील खंडाळकर, हंबीरराव भिसे यांनी केले. वैजनाथ गुगळे यांनी आभार प्रदर्शन केले.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय