रत्नागिरी : नुकताच सुशीलकुमार पावरा यांनी आंतरराष्ट्रीय मूर्ती पुरस्कार 2021 (International Idol awards 2021) जिंकल्यानंतर आता “सूर महाराष्ट्राचा” गायन स्पर्धेतही आपल्या गीत गायनाने परिक्षकांना प्रभावित केले आहे. मराठी गाण्यांची मराठमोळी ही स्पर्धा असून फक्त मराठी भाषेतीलच गाणे गायण्याची अटी व शर्ती आहेत. सुशीलकुमार पावरा यांनी या स्पर्धेत “स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार” हे देशभक्ती गीत गायन केले होते. हे गाणे कुठल्याही संगीत, वाद्याचा वापर न करता गायले होते. परिक्षकांना सुशीलकुमार पावरा यांचे गाणे आवडले म्हणून सूर महाराष्ट्राचा गीत गायन स्पर्धेतही सुशीलकुमार पावरा यांचे मेगा ऑडीशन राऊंड मध्ये निवड झाली आहे.
स्पर्धा आयोजकांनी सुशीलकुमार पावरा यांचे अभिनंदन केले आहे. आदिवासी बांधवांनी व अनेक मित्रांनी सुशीलकुमार पावरा यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसे निवडीचे प्रमाणपत्र डाॅ.धनश्री हरदास व निखील मुळे यांनी सुशीलकुमार पावरा यांना पाठवले आहे व आता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश दिला आहे.
उपांत्य फेरीत सुशीलकुमार पावरा यांनी “गारवा” हे मराठी भावगीत लाईव्ह गायन करून पाठवले आहे. उपांत्य फेरीनंतर अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेचा निकाल २५ एप्रिल २०२१ रोजी लागणार आहे. १५ हजार रूपये रोख रक्कम व डिजीटल प्रमाणपत्र असे या स्पर्धेचे बक्षीस आहे. ही स्पर्धा एकूण तीन गटात असून पावरा यांचा दुसऱ्या गटात समावेश आहे. सुशीलकुमार पावरा यांना ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे.