Tuesday, April 23, 2024
Homeग्रामीणमहाराष्ट्रातील कळसुबाई शिखर पर्यटकांसाठी बंद, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याची सुशिलकुमार...

महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर पर्यटकांसाठी बंद, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याची सुशिलकुमार चिखले यांची माहिती

बारी : महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाईच्या पायथ्याशी असलेले ग्रामपंचायत बारी व जहागिरदारवाडी व स्थानिक रहिवासी यांच्या संयुक्त निर्णयानुसार कोरोना व्हायरस ( Covid -19 ) चा प्रादुर्भाव वाढत असुन स्थानिक नागरिकांचे आरोग्याला बाधा पोहचु नये व कोरोनाची  तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता पुढिल अनिश्चित कालावधिपर्यत कळसूबाई हद्दीतील कळसुबाई शिखर, माची मंदिर, गाव व शिवार स्थळांना भेट दिल्यास पर्यटकांना भाविकांना व व्यावसायिकांना तसेच सर्व शायकिय अधिका – यांना जाहिर प्रतिबंध करण्यात येत आहे. 

या संपूर्ण कालावधीत कळसुबाई क्षेत्रात गावातुन किंवा इतर काही मार्गाने प्रवास करण्यास मनाई राहिल. गावात प्रवेश केल्यास किंवा आड मार्गाने कळसुबाई शिखर आणि लगत परिसरात आडल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे.

तसेच वाहन गाव शिवारात आढळल्यास वाहनाची हवा काढण्यात येईल व ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायत या कोणाशीही वाद घातल्यास होणाऱ्या कोणत्याही घटना / कार्यवाहीस सदर व्यक्ती जबाबदार राहणार नाही असेही म्हटले आहे.

असा ठराव आज सुशिलकुमार चिखले तालुकाअध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ अकोले तालूका व सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने मंजुर करण्यात आला आहे, अशी माहिती सरपंच वैशाली हिरामन खाडे यांनी दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय