Wednesday, September 28, 2022
Homeग्रामीणसुरगाणा : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन करण्याचा इशारा

सुरगाणा : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन करण्याचा इशारा

सुरगाणा / दौलत चौधरी : नाशिक जिल्हा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे कर्मचारी गटसचिव यांनी असहकार व कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या बाबतचे निवेदन सहाय्यक निबंधक बाळकृष्ण मवाळ  यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्य़ातील आदिवासी विविध  कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव व कर्मचारी यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून आदिवासी भागातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता संस्थेमार्फत होणारे कर्ज वाटप पुर्णपणे  थांबले आहे. आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास  व्हावा या करीता आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थाचे आदिवासी  उपयोजना क्षेत्रात खुप मोठे स्थान आहे.

त्यामुळे आदिवासी संस्थेच्या सचिवांना कोविड 19 मध्ये विमा संरक्षण मिळावे, संस्था सचिव व कर्मचारी यांना आदिवासी विकास महामंडळात कायम स्वरूपी सामावून घेण्यात यावे, अनिष्ट तफावती मधील संस्थाना कर्ज वाटप करण्यात यावे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या केडरला पगारा करीता कर्ज वाटपावर एक टक्का प्रमाणे निधी मिळतो तसाच निधी आदिवासी संस्थेला देण्यात यावा, सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी दिलेल्या पत्राची तात्काळ अंमलबजावणी करावी यासह अनेक  मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 

निवेदनावर अध्यक्ष एकनाथ गुंड, उपाध्यक्ष बाळासाहेब चंद्रमोरे, सरचिटणीस संदीप फुगे, तर गावनिहाय गटसचिव भरत पवार (आमदा प), मनोहर जाधव (पळसन),  योगेश गांवडे (हातरुंडी), मनोहर पवार (खोबळा), सोमनाथ राठोड (बा-हे), नारायण वार्डे (खोकरविहीर), शांताराम गवळी (हतगड),  सुभाष ठाकरे (बोरगाव), शंकर गाढवे (मालगव्हाण,  वाळूटझिरा), केशव भोये (कोटंबी), जयवंत चौधरी (सुरगाणा, भदर, रोकडपाडा), पंढरीनाथ कामडी (मनखेड), लक्ष्मण गायकवाड (चिंचपाडा) आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय