Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणसुरगाणा : जलपरिषद वृक्षरोपण मोहिमेत १४,६५७ वृक्षांची लागवड

सुरगाणा : जलपरिषद वृक्षरोपण मोहिमेत १४,६५७ वृक्षांची लागवड

हरसूल : बारीपाडा  येथे जलपरिषद मोहिमेचा आदिवासी सेवक पुरस्कर्ते भिवा महाले यांच्या हस्ते फणसाचे झाड लावून समारोप करताना मान्यव

हरसुलला समारोप; त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, सुरगाणा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद 

सुरगाणा / दौलत चौधरी : ‘ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी फक्त एक धाव पाण्यासाठी’ हे ब्रीद वाक्य घेऊन जलपरिषद मित्र परिवाराने पुन्हा एकदा हाती घेतलेल्या जलपरिषद  १,१११ वृक्षरोपण मोहिमेचा हरसूल जवळील बारीपाडा येथे आदिवासी सेवक पुरस्कर्ते तसेच माजी पंचायत समिती सभापती भिवा महाले यांच्या हस्ते फणसाचे झाड लावून समारोप करण्यात आला.

यावेळी त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा दिंडोरी तालुक्यात या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने १४,६५७ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

जलपरिषद मित्र परिवाराने त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, सुरगाणा तालुक्यात शनिवार (दि.५ जून ) रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शेवगापाडा या पाड्यात ११ शेवगाजातीच्या वृक्षांची लागवड करत जलपरिषद १,१११ वृक्षरोपण मोहीम हाती घेतली होती. ५ जून ते २५ जुलै दरम्यान सुरू असलेल्या वृक्षरोपण मोहिमेला त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ तसेच दिंडोरी तालुक्यातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून १४,६५७ वृक्षांची श्रमदानातून लागवड करण्यात आली. या वृक्षलागवडीमध्ये शेतकरीवर्गाचा मोठा सहभाग आहे. 

यावेळी जलपरिषदेचे देविदास कामडी, काशीनाथ बोरसे, अनिल बोरसे, पोपट महाले, हिरामण महाले, साळीबाई लांघे, तुकाराम पारधी, प्रकाश लांघे, रामदास लांघे, मोहन लांघे, महेंद्र पारधी, नारायण रानडे, ढवळू लांघे, यमुना लांघे, मीरा लांघे, प्रिंयका लांघे, शंकर पेंढार, खुशाल पारधी आदी उपस्थित होते.

मोलाचे सहकार्य 

जलपरिषद १,१११ वृक्षरोपण  मोहिमेत त्र्यंबकेश्वर तालुक्याचे तहसीलदार दिपक गिरासे, गटविकास अधिकारी किरण जाधव, जलपरिषद सदस्य राकेश दळवी, सुरगाणा पं.स.सभापती मनीषा महाले, सामाजिक कार्यकर्त्या भारती भोये, पत्रकार नितीन गांगुर्डे, मार्गदर्शक देविदास कामडी, रतन चौधरी, इंजि.गणेश गवळी, नामदेव पाडवी, हिरामण चौधरी, योगेश महाले, मनीषा घांगळे, गणेश सातपुते, नवनाथ गांगुर्डे, प्रकाश पवार, देवचंद महाले, संजय गवळी, रोहिदास बोरसे, नेताजी गावीत आदींसह शेतकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

“जलपरिषद मित्र परिवाराने हाती घेतलेली वृक्षरोपण मोहीम समाजहिताच्या दृष्टीने तसेच निसर्गाशी निगडित संवर्धन तसेच संगोपन रहित असल्याने कौतुकास्पद आहे.यामुळे आदिवासी तालुक्यात अशाच मोहिमेद्वारे वृक्षरोपण करण्याची गरज आहे.वृक्षलागवड आणि त्याचे जतन जलपरिषद मित्र परिवाराच्या  माध्यमातून करण्यात येत असल्याने मनस्वी आनंद होत असून या मोहिमेत सहभागी झालो आहे.”

– भिवा महाले,

  आदिवासी सेवक पुरस्कर्ते हरसूल

“जलपरिषद मित्र परिवाराने या अगोदर १०१ वनराई बंधारे,पशुपक्षी संवर्धन,एक झाड लेकीचे उपक्रमासह १,१११ वृक्षरोपण मोहीम हाती घेत ग्रामस्थांच्या श्रमदानातून पूर्णत्वास नेली आहे. या मोहिमेत त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यातुन उत्स्फूर्तपणे सहभाग मिळाल्याने १४  हजाराहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थांचे विशेष आभार.

– पोपट महाले,

  जलपरिषद मित्र परिवार 


संबंधित लेख

लोकप्रिय