Saturday, April 20, 2024
Homeग्रामीणसुरगाणा : बडोदा बँकेच्या भोंगळ कारभाराविषयी डीवायएफआय तर्फे आंदोलन !

सुरगाणा : बडोदा बँकेच्या भोंगळ कारभाराविषयी डीवायएफआय तर्फे आंदोलन !

समाजाच्या न्याय हक्कासाठी तरुणाई रस्त्यावर

सुरगाणा ता.६ (दौलत चौधरी) : नोटांबंदी पाठोपाठ देना बँकेचे रुपांतर बडोदा बँकेत झाल्याने सर्वसामान्य जनतेला व्यवहाराकरीता खुपच हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. याच भोंगळ कारभाराविषयी डीवायएफआय संघटने तर्फे युवकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले. 

तालुक्यातील आदिवासी, शेतकरी, युवक, विद्यार्थी, व्यावसायिक यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. तालुक्यात (देना बँक) बँक ऑफ बडोदा या सर्वात जुन्या बँक शाखेमध्ये साधारण एक लाखाहून अधिक खातेदार आहेत. त्या खातेदारांमध्ये विद्यार्थी, नोकर वर्ग, शेतकरी, ते वृद्धांपर्यंतच्या खात्यांचा समावेश आहे. पुर्वी देना बँक होती आता त्या बँकेचे वर्गीकरण बँक ऑफ बडोदा मध्ये झाल्यामुळे साधारण एक वर्षापासून शे-दोनशे खातेदार सोडले तर उर्वरित एक लाख खातेदारांना अद्याप पर्यंत बँक पासबुक मिळाले नाही. पासबुक अभावी खातेदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्व खातेदारांना एक महिन्याच्या आत पासबुक द्या अशी मागणी करत डीवायएफआय या संघटनेच्या नेतृत्वाखाली बँक ऑफ बडोदा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध समस्यांचे निवेदन बँकेचे शाखाधिकारी यांना देण्यात आले. 

यावेळी शाखाधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांना, येत्या एक महिन्याच्या आत सर्व खातेदारांना पासबुक उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच इतरही मागण्या लवकर सोडवू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात पांडुरंग गायकवाड, सुभाष भोये, अशोक धुम, चंद्रकांत वाघेरे, कान्हा हिरे, शिवराम गावित, राहुल आहेर, देविदास हाडळ, नितीन गावित, मेनका पवार, रोहिणी वाघेरे, सविता गायकवाड, भारती चौधरी, नितीन पवार, सुनिल जाधव, संतु पालवा, वसंत झिरवाळ, गुलाब खांडवी, गिरीष गायकवाड, मधुकर म्हसे, दानिएल गांगुर्डे, जगन गावीत,  राहुल गावीत, लिलाधर चौधरी, अशोक भोये, हेमंत भुसारे, योगेश थोरात, संस्कार पगारीया उपस्थित होते.

या आंदोलनास धर्मेंद्र पगारीया, सुरेश गवळी, मधुबाबा, राजु शेख, वसंत बागुल, चिंतामण गवळी, भास्कर जाधव, योगेश महाले, पांडुरंग गावीत, मोहन पवार, कृष्णा भोये यांनी पाठिंबा दिला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय