Thursday, April 25, 2024
Homeकृषीसुरगाणा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, DYFI तर्फे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ धरणे...

सुरगाणा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, DYFI तर्फे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन

सुरगाणा / दौलत चौधरी : सुरगाणा तहसिल कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात २६ जून रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. देशाची राजधानी दिल्लीच्या वेशीवर शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्यासाठी लाखो शेतकरी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून आंदोलनाला बसले असून त्या शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी नाशिक जिल्हा अखिल भारतीय किसान सभा, माकपा, DYFI, जनवादी महिला संघटना यांच्या नेतृत्वाखाली या एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

■ आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

● केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करावेत.

● पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ मागे घ्या.

● देशातील सरकारी मालमत्तेचे खाजगीकरण मागे घ्या.

● ST – SC समाजाचे पदोन्नती रद्द चा कायदा मागे घ्या.

● फॉरेस्ट प्लॉट संदर्भात जो सातबारा झाला आहे तो चुकीच्या पद्धतीने झाला आहे. त्यामध्ये इतर अधिकारामध्ये केला गेला असून तो दुरुस्त करावा.

● कमी क्षेत्रधारकांना वाढीव क्षेत्र मिळावे.

यावेळी सुरगाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिवाणशिंग वसावे यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

धरणे आंदोलनाचे नेतृत्व माकप तालुका सचिव कॉ.सुभाष चौधरी, इंद्रजीत गावीत, जनार्दन भोये, भिमाशंकर चौधरी, सुरेश भाऊ गवळी,रामभाऊ महाले, पांडुरंग गायकवाड, हिरामण वाघमारे,संजय पवार,भरत पवार, भास्कर जाधव, चंदर वाघमारे, पांडुरंग वाघमारे,संतु पालवा, गोपाळ सितोडे, के. डी. भोये, देवराम बागुल, सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय