Friday, December 6, 2024
Homeग्रामीणसुरगाणा : अनावश्यक खर्चाला फाटा देत अनोख्या पद्धतीने वाढदिवस केला साजरा

सुरगाणा : अनावश्यक खर्चाला फाटा देत अनोख्या पद्धतीने वाढदिवस केला साजरा

सुरगाणा (दौलत चौधरी) : अनावश्यक खर्चाला फाटा देत राजेंद्र पवार या युवकांने अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसा निमित्ताने कोविड रुग्णालयात एकवीस हजाराची मदत केली आहे. 

एकीकडे कोरोना महामारीने अख्खे जग संकटात सापडलेले असतांना मदतीचा ओघ केवळ जागतिक स्तरावरुन मिळतोय असे नव्हे तर अगदी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत आरोग्याची सेवा सुविधा उभारण्या करीता अनेकांकडून आर्थिक मदत अथवा वस्तू रुपाने मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.

राष्ट्रवादी कांग्रेस युवा तालुका अध्यक्ष राजेंद्र मोहन पवार यांनी एकतिसाव्या वाढदिवसा निमित्ताने  ग्रामीण रुग्णालयात बेबी वार्मर या नवजात शिशुंचे तापमान नियंत्रित करणारे उपकरणाची गरज ओळखून ते मशीन खरेदी कामी डॉ. माधुरी गावित, डॉ. सुरेश पंडोले यांच्याकडे रोख (21000) एकविस हजार रुपयाचा निधी सुपूर्द केल्याने त्यांचे सामाजिक स्तरात कौतुक केले जात आहे.

एरव्ही सामाजिक कार्यकर्ता उदयाला येत असतांना चौका चौकात, रस्त्यावर पोस्टरबाजी, मोठ मोठे डिजिटल फ्लेक्स उभारुन शहराचे, चौकाचे विद्रुपीकरण केले जाते. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अनावश्यक खर्च केला जातो. हा खर्च टाळत वाढदिवस साजरा न करता तो वाचलेला पैसा एखादी वस्तू घेण्यासाठी त्याचा विनियोग झाला पाहिजे. या करीता मदत केली आहे. तहसीलदार किशोर मराठे यांनी कोविड निधिस शासनास आर्थिक सहकार्य करीत मदतीचा हात पुढे केल्याने औषध विक्रेता नवसू धुम, राजेंद्र पवार यांचे स्वागत केले आहे.

कोरोना मदत देवदूत सोशल मीडिया गृपचे सदस्य रामभाऊ थोरात, भगवान आहेर, जिल्हा परिषदेचे शिक्षक रतन चौधरी, बालरोग तज्ञ डॉ. प्रवीण पवार, डॉ योगिता जोपळे, डॉ. दीपिका महाले, डॉ. भास्कर देशमुख, डॉ. सुनयना पवार, डॉ. विनोद राऊत व सर्व कर्मचारी तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते खंडू वाघमारे, यशोधन देशमुख, दिनेश चौधरी,  विजय दळवी, भागवत महाले यांनी आभार मानले आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय