Sunday, December 8, 2024
Homeराजकारणकेंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; ED संचालक संजय मिश्रा यांची मुदतवाढ...

केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; ED संचालक संजय मिश्रा यांची मुदतवाढ बेकायदा

नवी दिल्ली : ईडीचे संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवण्याचा केंद्राचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतरही मिश्रा 31 जुलैपर्यंत पद सोडण्याचे आदेश दिले आहेत. हा केंद्र सरकारला जोरदार झटका दिला असल्याचे बोलले जात आहे. तसेच सरकार 15 दिवसांत ईडीच्या नवीन संचालकांची नियुक्ती करू शकतं, असा आदेशही कोर्टानं दिला आहे.

केंद्र सरकारने सलग तिसऱ्यांदा संजय मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवला होता. मिश्रा हे मागील 18 नोव्हेंबर 2018 रोजी निवृत्त होणार होते. त्यानंतर सरकारने एकेक वर्षासाठी त्यांचा कार्यकाळ वाढवला होता. तिसऱ्यांदा केलेल्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. त्यावर गेल्या वर्षी 12 डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने सरकारकडून उत्तर मागितले होते. त्यानंतर यावर सुनावणी करताना 8 मे रोजी कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवला होता.

सरकारकडून ईडीचे (ED) संचालक संजय मिश्रांचा कार्यकाळ वाढवण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने म्हटले की, कायदा तयार करण्याचे अधिकार सरकारकडे आहेत. मात्र, अशा प्रकारे कार्यकाळ वाढवणे अवैध आहे. सध्याच्या संचालकांचा सेवा कार्यकाळ 31 जुलैपर्यंतच असेल.

2021 मध्येच SC च्या निर्णयाविरोधात केंद्राने अध्यादेश आणला

नोव्हेंबर 2021 मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय दक्षता आयोग कायद्यात बदल करून अध्यादेश आणला. या दुरुस्तीमध्ये तपास यंत्रणा ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांच्या संचालकांना पाच वर्षांपर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकते, अशी तरतूद होती.

केंद्राच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आणि टीएमसी नेत्यांची याचिका

केंद्राच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले होते. काँग्रेस नेत्या जया ठाकूर, रणदीप सुरजेवाला, टीएमसी खासदार महुआ मोईत्रा, साकेत गोखले यांच्या वतीने दाखल याचिकाकर्त्यांनी सांगितले की, ईडी ही अशी संस्था आहे, जी देशातील आणि प्रत्येक राज्यातील सर्व प्रकारच्या प्रकरणांची चौकशी करते. त्यामुळे ती स्वतंत्र असावी.

हे ही वाचा :

‘एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्रता होणार…’ विधान विधानसभेच्या उपाध्‍यक्षचं वक्तव्य

मोठी बातमी : १२ आमदारांसदर्भात सर्वोच्च न्यायालाचा मोठा निर्णय

खळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या

ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

संबंधित लेख

लोकप्रिय