Thursday, February 13, 2025

शहरी जनतेच्या प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी माकपला साथ द्या – अमिन शेख

पिंपरी चिंचवड : दि. १७ डिसेंबर २०२१ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महागाई च्या विरोधात रॅली आयोजित केली होती, रॅलीची सुरूवात पाडळे पुतळ्याला हार घालून झाली. या रॅली नंतर छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्या समोर कार्यकर्ते व नागरिक यांना अमिन शेख यांनी संबोधित केले. 

शेख म्हणाले, आकुर्डी आणि दत्तवाडी परिसरामध्ये खूप वेगवेगळ्या मुद्दयांवर लोक त्रासलेली आहेत. इथे प्रस्थापित असलेले  नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते हे आपल्या वेळेनुसार लोकांना वेळ देत आहेत. त्यांनी आधी निवडून देणाऱ्या जनतेची कामे केली पाहिजे, असे न करता ते बिल्डर लॉबी व कंत्राटीदारांचीच काम करतात.

या परिसरात रस्त्याचा पार्किंगचा मुद्दा आहे, लोक आपले वाहन रस्त्यावर लावतात. त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम होते,  पुण्यासारखी पार्किंग स्थळे नाहीत, वर्क फ्रॉम होम करणाऱ्याचे हाल होत असून ६ – ६ तास वीज जाते, पाण्याचा प्रश्न आहे. अशा वेगवेगळे मुद्दे मांडून माकपही पालिका निवडणुकीत उतरणार असल्याचा संदेश दिला. तसेच शहरी जनतेच्या प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी माकपला साथ द्या, असेही अमिन शेख म्हणाले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles