Friday, April 19, 2024
Homeजिल्हाअंधश्रद्धेमुळे चिकित्सा करण्याची वृत्ती नष्ट होते : कृष्णा चांदगुडे

अंधश्रद्धेमुळे चिकित्सा करण्याची वृत्ती नष्ट होते : कृष्णा चांदगुडे

नाशिक जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन दिन साजरा

नाशिक : संविधानाने धर्मपालनाचा व उपासनेचा आधिकार प्रत्येकाला बहाल केला आहे. मात्र त्या बरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करण्याचे कर्तव्य संविधानाने सांगितले आहे. त्यामुळे श्रद्धा या बुद्धीच्या कसोटीवर तपासुन घ्याव्यात कारण  अंधश्रद्धेमुळे चिकित्सा करण्याची वृत्ती नष्ट होते,असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे. जिजाऊ ब्रिगेड तर्फे झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.

दि. 21 सप्टेंबर 1995 रोजी गणपतीने दुध प्राशन केल्याची अफवा पसरली होती. देशातील नव्हे तर परदेशात गणपतीने दुध प्राशन केल्याचा दावा भक्तांनी केला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेची चिकित्सा करून सत्यशोधन केले होते.     

हेही वाचा ! २४ सप्टेंबर : योजना कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप !

तेंव्हा पासून हा दिवस जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिन म्हणून ओळखला जातो. त्या निमित्ताने हा कार्यक्रम फेसबुकवरून प्रसारित झाल्याने राज्यभरातील कार्यकर्त्यांचे प्रबोधन झाले.कार्यक्रमाची सुरुवात तथाकथित चमत्कार करत पाण्याने दिवा पेटवून झाली. त्यामागचे विज्ञान चांदगुडे यांनी स्पष्ट करून सांगितले. यावेळी माणसे अंधश्रद्धेच्या आहारी का जातात, बुवावाबा कडे लोकांची गर्दी का होते, अंनिसपुढचे आव्हान काय आहे, जात पंचायतचे काम कसे चालते, कौमार्य परीक्षा कशी घेतली जाते आदी प्रश्नांची उत्तरे दिली.

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष शिवमती माधुरी भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली खास चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. जिजाऊ वंदन गायन सई वाकचौरेने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा वैशाली डुंबरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय जिल्हाध्यक्ष अनुराधा धोंडगे यांनी केला.

हेही वाचा ! आम्ही जगायचं कसं, हे सरकारला विचारा, आशा स्वयंसेविकांचा संतप्त सवाल !

या चर्चासत्रामध्ये वैशाली डुंबरे, अनुराधा धोंडगे, रोहिणी बाविस्कर-मोरे, कल्याणी वाघ, सुरेखा कोल्हे, संगीता पाटील या जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. बडदे नगर शाखाप्रमुख रोहिणी मोरे यांनी आभार मानले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय