अकोले : अकोले तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार सुनील गीते यांची तर प्रवीण धुमाळ यांची सेक्रेटरी पदावर बिनविरोध निवड करण्यात आली.
अकोले तालुका पत्रकार संघाची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष विलास तुपे यांच्या अध्यक्षतेखाली राजूर येथील शासकीय विश्रामगृह येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, यात ही निवड करण्यात आली. प्रारंभी मागील वर्षाच्या अहवालाचे वाचन करून ते मंजूर करण्यात आले.
सुनील गीते यांच्या नावाची सूचना गोकुळ कांनकाटे यांनी मांडली, त्यास विश्वस्त बाळासाहेब मेहेत्रे यांनी अनुमोदन दिले, तर प्रवीण धुमाळ यांच्या नावाची सूचना विश्वस्त श्रीनिवास रेणूकदास यांनी मंडली, त्यास राजेंद्र उकिरडे यांनी अनुमोदन दिले. पदाधिकारी निवडीनंतर नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्षपदी सुनील गीते सेक्रेटरी प्रवीण धुमाळ उपाध्यक्ष पदी सचिन खरात, संजय उकिरडे, भगवान पवार, नितीन शहा, खजिनदार आबासाहेब मंडलिक सह सेक्रेटरी विनायक घाटकर, यांची निवड करण्यात आली.
यावेळी विश्वस्त प्रा. बाळासाहेब मेहेत्रे, श्रीनिवास रेणुकादास, नंदकुमार मंडलिक, रमेश खरबस, गोकुळ कानकाटे, विलास तुपे, राजेंद्र जाधव, राजेंद्र उकिरडे, विनय समुद्र, संजय महानोर, राजेंद्र देशमुख, हरिभाऊ आवारी, गोरक्ष घोडके, संदीप दातखिळे, आदी सदस्य उपस्थित होते.
पत्रकार संघामार्फत तालुक्यात विविध समाजिक उपक्रम राबवू तालुक्यातील सर्व सामान्य जनतेचे प्रश्न व समस्या ची सोडवणूक करण्यासाठी पत्रकार संघ नेहमी पुढे राहिल, असे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील गीते यांनी यावेळी सांगितले. राजेंद्र उकिरडे यांनी आभार मानले. सर्व पत्रकार नूतन पदाधिकाऱ्यांचे निवडीचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.