Friday, June 9, 2023
Homeशहरशहर भाजपातर्फे वर्धापन दिनाची जय्यत तयारी

शहर भाजपातर्फे वर्धापन दिनाची जय्यत तयारी

संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांची माहिती ;मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
:भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन येत्या ६ एप्रिल रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त शहर भाजपातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यासह ‘सावरकर गौरव यात्रा’ आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचीही तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.

मोरवाडी, पिंपरी येथील भाजपा शहर कार्यकारिणीची बैठक शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीच्या सुरुवातीस पुणे लोकसभेचे खासदार गिरीष बापट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी चिंचवड विधानसभेच्या आमदार श्रीमती अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे व माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते

अमोल थोरात म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार दि. ६ एप्रिल रोजी पक्षाचा वर्धापन ध्वजारोहण व विविध कार्यक्रम करून साजरा करण्यात येणार आहे. तसेच, दि.९ एप्रिल रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा शहरातील तीन विधानसभांमध्ये घेण्यात येईल. तसेच, दि. १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शहरात विविध ठिकाणी साजरी करणार आहोत.

 


संबंधित लेख

 


लोकप्रिय