Monday, July 15, 2024
Homeजिल्हाबिरसा फायटर्सच्या लढ्याला यश, उशिरा का होईना वसतिगृहे सुरू

बिरसा फायटर्सच्या लढ्याला यश, उशिरा का होईना वसतिगृहे सुरू

नंदुरबार : आदिवासी वसतिगृहे सुरू करा, अशी मागणी बिरसा फायटर्स चे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी यांनी केली होती. या मागणीला यश आले असून नवसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत.

पाडवी म्हणाले, वसतिगृहे सुरू करावीत यासाठी सप्टेंबर महिन्यापासून सतत पाठपुरावा सुरू होता. बिरसा फायटर्स कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रकल्प अधिकारी यांना घेराव घालून जाब विचारला. संबंधित वसतिगृह गृहपाल यांना आजपासूनच वसतिगृहे सुरू करण्याचे सूचना देतो म्हटले. एकलव्य रेसिडेंशीयल स्कुलमध्ये प्रत्येक ठिकाणी चार शिक्षकांची नियुक्ती केली आहे सांगण्यात आले. अखेर लढ्याला यश आले.”

यावेळी बिरसा फायटर्स जिल्हाध्यक्ष भरत पावरा, संतोष गावीत, दयानंद चव्हाण, प्रताप पावरा, गुलाबसिंग वळवी, सुभाष पावरा, कलावती वळवी, सुनील पाडवी, गुलाबसिंग पाडवी, मगन वळवी, सागर वळवी मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. 


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय