Thursday, February 13, 2025

विद्यार्थ्यांनो, जीवनात यशस्वी होण्यासाठी भरपूर अभ्यास करा – राजेंद्र पाडवी

तळोदा : गेल्या दोन वर्षापासून कोविड-१९ मुळे न भरून येणारे शैक्षणिक नुकसान झाले आहे. यासाठी आता अभ्यासाला लागून या स्पर्धेच्या युगात टिकून, यश संपादन करण्यासाठी भरपूर अभ्यास करावा. जिद्द, चिकाटी, मेहनती करण्याची तयारी ठेवावी. व्यसनापासून दूर राहावे. आपणांस आपल्या जीवनाचा शिल्पकार बनले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी थोर महापुरुषांची आत्मचरित्र वाचावी. नेहमी सकारात्मक राहावे. 

यावेळी पुढे बोलतांना डॉ.ए.पी.अब्दुल कलाम, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला या थोर महापुरुषांच्या जीवनातील काही प्रसंग, उदाहरणे दिली. अभ्यास कसा करावा व लक्षात कसं ठेवावे याविषयी ही काही ट्रिक दिल्या. ते आमलाड येथील विद्यार्थी अभ्यास संवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गुलाबसिंग वळवी, तुकाराम पावरा, अनमोल पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले. वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रावण वसावे यांनी आभार मानले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles