Tuesday, September 17, 2024
Homeजिल्हाराज्य सरकार व एस.टी महामंडळाच्या वादात विद्यार्थ्यांना वेटीस धरू नये - एसएफआय

राज्य सरकार व एस.टी महामंडळाच्या वादात विद्यार्थ्यांना वेटीस धरू नये – एसएफआय

तहसीलदारांना विविध मागण्यांचे देताना एसएफआय चे पदाधिकारी व विद्यार्थी

अक्कलकोट : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया – (एसएफआय) ता. अक्कलकोट कमिटी च्यावतीने तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांना निवेदन देण्यात आले. 

गेल्या काही महिन्यापासून एस. टी. महामंडळाचे बसेस बंद आहेत. ग्रामीण भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेस बंद असल्याने शाळा – महाविद्यालयला जाता येत नाही. 10 वी आणि 12 वी चे वर्ग सुरु आहेत पण घरापासून शाळा – महाविद्यालय लांब असल्याने बरेच विद्यार्थ्यांना जा – ये करण्याचे अडचण असल्याने घरीच बसून राहावे लागत आहे. 

बसेस बंद असल्यामुळे मुलींच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम 

महाविद्यालयाचे पेपर असताना ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी जाऊ शकत नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एस. टी महामंडळाचे बसेस बंद असल्याने पालकांनी मुलींना शाळा – महाविद्यालयास पाठविण्यास नकार देत आहेत. आणि याचं परिणामी मुलींच्या शैक्षणिक वर्षावर आणि त्याच्या भविष्यावर पडतं आहे. खास करून मुलींना खाजगी वाहनातुन प्रवास करीत असताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मुळे मुलीच्या शैक्षणिक टका घटणार, आणि खाजगी वाहन चालकांनी विद्यार्थ्यांकडून प्रवासाचे पैसे अव्वाचे सव्वा रुपये घेत आहेत. 

पण खाजगी वाहनानी प्रवास करताना विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्याची जबाबदार कोण? या सर्व करणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी – विद्यार्थिनी शिक्षणापासून अजून वंचित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य सरकार आणि एस. टी महामंडळाच्या वादात विद्यार्थ्यांना वेटीस धरू नये, असेही म्हटले आहे.

…अन्यथा तीव्र आंदोलन – जिल्हा उपाध्यक्ष विश्वजीत बिराजदार 

 

सर्व समस्यांचा विचार करून संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून तात्काळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासाठी एस. टी. महामंडळाचे बसेस सुरु करा. अन्यथा प्रवासी, शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एसएफआय जिल्हा उपाध्यक्ष विश्वजीत बिराजदार यांनी दिला.

यावेळी केदार मोरे, मनोज सुरवसे, आनंद बिराजदार, मारुती मोरे, आकाश वसईकर, अमर दगडे, किरण येवते, अभिजीत काळे, वैभव कोळी, समर्थ गुंड  इ. विद्यार्थी उपस्थित होते.  


संबंधित लेख

लोकप्रिय