Thursday, April 25, 2024
Homeजिल्हासेतू कार्यालयात विद्यार्थी - पालकांची एजंटाकडून होणारी लूट थांबवा - एसएफआय

सेतू कार्यालयात विद्यार्थी – पालकांची एजंटाकडून होणारी लूट थांबवा – एसएफआय

विद्यार्थ्यांनी दाखले काढत असताना सर्वच मूळ कागदपत्र जोडावे असे जाचक अट रद्द करा – एसएफआय 

सोलापूर : सेतू कार्यालयात विद्यार्थी – पालकांची एजंटाकडून होणारी लूट थांबवा व विद्यार्थ्यांनी दाखले काढत असताना सर्वच मूळ कागदपत्र जोडावे असे जाचक अट रद्द करण्याची मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) सोलापूर जिल्हा समिती च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेला आहे. सध्या अकरावी व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांनी विविध विभागाला प्रवेश घेत असताना त्यांना महाविद्यालयात विविध दाखल्यांची मागणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थी व पालकांनी सेतू कार्यालयात विविध दाखल्यासंदर्भात अर्ज दाखल करीत आहेत. पण दक्षिण तहसील कार्यालयाच असं म्हणणं आहे. कोणत्याही दाखल्यासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी अर्ज दाखल करत असताना त्यांनी कंपल्सरी सर्व कागदपत्र मूळ जोडावे असे जाचक अट लावलेलं आहे.

एसएफआय ने विनंती केली आहे की, सर्व विद्यार्थ्यांसाठी ते जाचक अट न करता ज्या अर्जात आपल्याला खरंच काहीतरी चूक किंवा खाडकोड आढळून आल्यास त्यांना आपण मूळ कागदपत्रे व मूळ पुरावे विचारण्यात यावे. असे त्यांना सांगण्यात आले. यासोबतच सेतू कार्यालयात विद्यार्थी व पालकांचे प्रचंड हाल होत आहे. सेतू कार्यालयात कर्मचारी वाढविणे गरजेचे आहे. अर्ज दाखल करण्याचे व ऍपीडीवेट करण्याचे खिडकी वाढविणे गरजेचे आहे. सेतू कार्यालयातील गर्दी संदर्भात व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांशी विचारणा केली असता त्यांनी सर्व्हर प्रॉब्लेम आहे असे सांगत आहेत. तरी लवकरात लवकर सर्व्हर प्रॉब्लेम दूर करण्यात यावे. सेतू कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात एजंट लोक बसलेले आहेत. त्यांना तात्काळ तिथून बाहेर काढण्यात यावे. आणि विद्यार्थी व पालक जे स्टॅम्प (अटीस्टेड) करून घेण्यासाठी जातात. त्या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकारी असलेल्या मॅडमने प्रत्येक स्टॅम्प (अटीस्टेड) ला दहा ते वीस रुपये विद्यार्थी व पालकांकडून घेतात. अशा घटनांना तात्काळ आळा बसलं पाहिजे, असेही म्हटले आहे.

अर्ज दाखल करत असताना कागदपत्रांमध्ये काय अडचण किंवा एखाद्या कागदपत्राची कमतरता असेल तर ते विद्यार्थ्याला सांगण्यात यावे व सेतू कार्यालयात दाखल्या संदर्भात स्वतंत्र एक चौकशी खिडकी व कागदपत्राची पाहणी करण्याची एक स्वतंत्र खिडकी असली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे दाखले तात्काळ वेळेवर मिळावे जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यांची दाखल्यामुळे शैक्षणिक वर्षाचा नुकसान होऊ नये अन्यथा एसएफआय रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी एसएफआयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जिल्हा समिती सदस्य दत्ता हजारे, विजय साबळे उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय