Tuesday, July 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही मदतीची प्रतीक्षा - आमदार महेश लांडगे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही मदतीची प्रतीक्षा – आमदार महेश लांडगे

– कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडचा ‘सीएसआर’मधून विधायक उपक्रम

– कडूस येथील रामभाऊ म्हाळगी विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप

पिंपरी : राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही मदतीची प्रतीक्षा आहे. विद्यार्थ्यांना ३ ते ४ किलोमीटरचा पायी प्रवास करुन शाळेत जावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडने सामाजिक बांधिलकीतून विधायक पुढाकार घेतला. त्यामुळे ५० विद्यार्थ्यांना मोफत सायकल मिळाल्यामुळे शिक्षणाच्या वाटेवरील प्रवास सुकर होईल, अशी अपेक्षा भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

खेड तालूक्यातील कडूस येथील रामभाऊ म्हाळगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कॅनरा रोबेको यांच्या ‘सीएसआर’ फंडाच्या माध्यमातून ५० विद्यार्थ्यीना मोफत सायकल वाटप करण्यात आले. त्यावेळी आमदार महेश लांडगे बोलत होते. 

यावेळी कंपनीचे महाराष्ट्र श्रेत्रीय अधिकारी कुलदिप थोरगुले, सहाय्यक विपणन अधिकारी निखिल पाठक, कांचन ग्रुपचे प्रताप ढमाले, सरपंच निवृती नेहेरे, ग्राम सदस्य लता ढमाले, मुख्याध्यापक अविनाश काळोखे, किसन ढमाले, अशोकराव गारगोटे, प्रकाश कालेकर, किसन गारगोटे, अशोक बंदावणे, सुदाम वारे, बाळासाहेब बोंबले, देविदास नेहेरे, नंदु जाधव तसेच सर्व विद्यार्थ्याचे पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, ग्रामीण भागात आजही विद्यार्थ्याना ३ ते ४ किमी पायी विद्यालयात यावे लागते. ही अडचण ओळखून कंपनीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. उद्योग विश्वासातील कार्पोरेट कंपन्यांनी सामाजिक बांधिलकीतून समाजातील गरजू घटकांना मदतीसाठी पुढे आले पाहिजे, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे नियोजन रामदास रेटवडे यांनी केले. सूत्रसंचालन तानाजी कोळेकर तर आभार दतात्रय येवले यांनी केले.

संपादन – क्रांतिकुमार कडूलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय