जुन्नर : पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपरिषद व छावणी परिषद हद्दीत सोमवार ते शुक्रवार रात्री ०६.०० ते सकाळी ०७.०० पर्यंत आणि शुक्रवार रात्री ६.०० ते सोमवार सकाळी ७.०० वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक कारण / अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही नागरिकांना बाहेर पडण्यास संपूर्णत : प्रतिबंध करण्यात आले आहे. आयपीसी कलम १४४ नुसार जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवांमध्ये खालील सेवा चालू राहणार :
● हॉस्पिटल, रोग निदान केंद्र ( डायग्नॉस्टिक सेंटर ) दवाखाने, आरोग्य आयुर्विमा कार्यालय, मेडीकल दुकाने, मेडीकल कंपन्या व इतर मेडीकल आरोग्य सेवेशी निगडित, किराणा दुकाने, डेअरी, बेकरी, भाजीपाला, फळे, मिठाई, खाद्यपदार्थाची दुकाने सुरु राहतील.
● सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये टॅक्सी, रिक्षा व सार्वजनिक बसेस सुरू राहतील.
● सर्व उद्याने सार्वजनिक मैदाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ०६.०० ते सकाळी ७.०० वाजेपर्यंत बंद राहतील . आणि शुक्रवारी रात्री ६.०० ते सोमवारी सकाळी ७.०० वाजेपर्यंत बंद राहतील.
● नागरीकांनी सदर ठिकाणी वावरताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास स्थानिक प्रशासनाकडूनवरील नमूद सार्वजनिक ठिकाणे तात्काळ बंद केली जातील.
● अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने, मार्केट, मॉल, संपूर्णतः बंद राहतील.
सार्वजनिक वाहतूक खालील मार्गदर्शक सूचना
● रिक्षा वाहन चालक + 2 व्यक्ती
●टॅक्सी / कॅब / चारचाकी वाहन चालक + RTO द्वारे निर्गमित केलेले आसन क्षमतेच्या 50 %
● स्वयंचलित वाहन आसनक्षमता बस, RTO द्वारे निर्गमित केलेले आसन क्षमतेनुसार सुरु राहतील.
प्रवासी उभे राहून प्रवास करण्यास प्रतिबंध राहिल.
● प्रवास करताना मास्क नसल्यास ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार.
● सहकारी, को – ऑपरेटीव्ह, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, खाजगी बँका, विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनी, दूरसंचार सेवा, पुरवठादार, विमा, मेडिक्लेम कंपनी, औषध उत्पादन करणारे वगळता सर्व खाजगी कार्यालये संपूर्णतः बंद राहतील.
● सर्व शासकीय कार्यालये 50 % उपस्थितीत सुरु राहतील.
● सर्व प्रकारची खाजगी वाहने, खाजगी बसेस सोमवार ते शुक्रवार सकाळी ७.०० ते सायं ६.०० यावेळेत अत्यावश्यक सेव वगळून सुरु राहतील. तसेच शुक्रवारी सायंकाळी ६.०० ते सोमवार सकाळी ७.०० पर्यंत संपूर्णतः बंद राहतील.
मनोरंजन व करमणूक संबंधित बाबी खालीलप्रमाणे :
सिनेमागृह ( Single Screen and Multiplex ) नाट्यगृह, मनोरंजन पार्क, अम्यूजमेंटपार्क / आर्केड्स, व्हिडीओ गेम पार्लर, वॉटरपार्क, स्विमिंगपूल, स्पा, व्यायामशाळा ( जिम ), क्रीडा संकुल ( Sports Complex ) / क्लब इ . आस्थापना संपूर्णतः बंद राहतील
● चित्रपट / मालिका / जाहिरातीचे शुटींग करण्यासाठी खालील प्रमाणे परवानगी राहील. मोठ्या संख्येने कलाकारांसह दृश्यांचे शुटींग करणे टाळावे. कलाकार व कर्मचारी यांनी 15 दिवसांची वैधता असणारा कोविड -19 निगेटिव्ह दाखला सोबत बाळगणे अनिवार्य आहे.
हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट संपूर्णतः बंद
● हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट (हॉटेलमधील रूम सर्विससाठी वगळून) पार्सल सेवा / घरपोच सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत सुरु राहील. शुक्रवारी सायंकाळी ०६.०० ते सोमवार सकाळी ०७.०० पर्यंत फक्त घरपोच सेवेकरिता परवानगी राहील. तेथे जाऊन पार्सल आणण्याची सुविधा असणार नाही.
● हॉटेलमधील रेस्टॉरंट / बार हे रूम सर्विससाठी खुले राहतील. परंतु, बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध राहील.
१. सर्व धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद राहतील.
२. सर्व स्पा, सलून, ब्युटी पार्लर, केश कर्तनालय संपूर्णतः बंद राहतील.
३. दैनंदिन वर्तमानपत्रे , मासिके , साप्ताहिके , नियतकालिके छपाई व वितरीत करणेस परवानगी राहील. वर्तमानपत्रांचे घरोघरी वितरणास सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत परवानगी राहील.
४. सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पूर्णतः बंद राहतील. इयत्ता 10 वी व 12 वी ची परीक्षा असल्यामुळे त्यांना यातून वगळण्यात येत आहे.
५. सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस पूर्णतः बंद राहील.
६. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रम, सभा संमेलने व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.
७. लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील. लग्न समारंभास उपस्थित असणा – या व्यक्तीस लसीकरण केलेले असावे.
८. अंत्यसंस्कार , दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
९. रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल ( टपऱ्या ) येथे अन्न पदार्थांचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील. घेऊन जाण्यास सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत परवानगी राहील.
१०. उत्पादन क्षेत्र पूर्ण क्षमतेने सुरु राहील.