Monday, January 13, 2025
HomeNewsहंसदेव जंगलाची वृक्षतोड तात्काळ थांबवा – बिरसा फायटर्सची मागणी 

हंसदेव जंगलाची वृक्षतोड तात्काळ थांबवा – बिरसा फायटर्सची मागणी 

शहादा : छत्तीसगड राज्यातील हंसदेव जंगलाची वृक्षतोड तात्काळ थांबवावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने सरकारकडे केली आहे. या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांच्यामार्फत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान व छत्तीसगडचे राज्यपाल, ट्रायबल अडवायझरी कौन्सिलचे अध्यक्ष तसेच भारत सरकारचे अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष, आयसीएआर चे अध्यक्ष यांना पाठविण्यात आले आहे.

निवेदन देते वेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, गोपाल भंडारी, प्रेम भोसले, सोमनाथ पावरा, डाॅ.योगेश पवार, पवन खेडकर, शरद पावरा, मनेश पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, छत्तीसगड राज्यातील आदिवासींचे देवस्थान असलेले हंसदेव जंगलाचा संपूर्ण परिसर संविधानाच्या पाचव्या अनुसूचित येत असून तो जैववैविध्यतेने नटला आहे.लाखो आयुर्वेदिक वनस्पती,झाडे झूडूपे व काही लुप्त होणा-या दुर्मिळ वनस्पती येथे असून पक्ष्यांसह फुलपाखरांच्या हजारो जाती वास्तव्यात आहेत. हजारो प्राण्यांच्या जाती या जंगलात असून हत्तींचे अनेक कळपही आहेत. जंगलातील ९२% हेक्टर क्षेत्र उद्योगपती गौतम अडानींना कोळशाच्या  उत्खननासाठी बेकायदेशीररित्या दिले आहेत. ४५० पेक्षा अधिक जवान हसदेव जंगलात तैनात करून त्यांच्या निगराणीखाली ५०० पेक्षा अधिक पेट्रोल वर चालणा-या आरे मशीनचा वापर करून जंगलातील बेसुमार वृक्षतोड सुरू करण्यात आली आहे.पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी ही बेसुमार वृक्षतोड तात्काळ थांबविण्यात यावी, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनास दिला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय