Saturday, December 7, 2024
Homeग्रामीणमोठी बातमी : 4 जानेवारी पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांंचे राज्यव्यापी आंदोलन

मोठी बातमी : 4 जानेवारी पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांंचे राज्यव्यापी आंदोलन

पुणे : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने 4 जानेवारी 2021 पासून राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन मिळालीच पाहिजे, या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजना २ ऑक्टोबर १९७५ रोजी सुरू झाली. २०२० मध्ये या योजनेला ४५ वर्ष पूर्ण झाली. अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आपल्या रक्ताचे पाणी करून लाभार्थ्यांना सेवा दिली. या योजनेचा पाया रचणाऱ्या आपल्यातील अनेक कर्मचारी कोणत्याही लाभाशिवायच ६५ वयानंतर रिकाम्या हाताने घरी गेल्या. २००३ पासून सातत्याने लढा दिला, संप केले तेव्हा कुठे २०१४ मध्ये एकरकमी सेवा समाप्ती लाभ पदरात पडला. परंतु त्यामध्ये मिळणारी १ लाख व ७५ हजारांची रक्कम आपल्या म्हातारपणाचा आधार बनण्यासाठी पुरेशी नसल्याचे अंगणवाडी कृती समितीने म्हटले आहे.  म्हणूनच कृती समितीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिन ४ जानेवारी २०२१ पासून रोज वेगवेगळ्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील यांंनी जाहीर केला.

आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

१. गेल्या २, ३ वर्षांपासून निवृत्त झालेल्या किंवा मयत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थकित  सेवा समाप्ती लाभ त्वरित अदा करण्यात यावा.

२. एकरकमी सेवा समाप्ती लाभ कायम ठेवून त्या व्यतिरिक्त सेविका मदतनिसांना त्यांच्या शेवटच्या मानधनाच्या निम्मी रक्कम मासिक पेन्शन स्वरूपात तहहयात देण्यात यावी.

३. भविष्यात कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाल्यास पेन्शनमध्ये त्या वाढीच्या निम्या रकमेची वाढ करण्यात यावी.

संबंधित लेख

लोकप्रिय