Friday, November 22, 2024
Homeजिल्हाकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवारांना निवेदन; आशा, गटप्रवर्तक न्याय द्या – कॉ.राजू...

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवारांना निवेदन; आशा, गटप्रवर्तक न्याय द्या – कॉ.राजू देसले

नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या कार्यालयात निवेदन आयटक वतीने देण्यात आले. १२ जानेवारी पासून राज्यातील ७८ हजार आशा व ३ हजाार ६०० वर गट प्रवर्तक संपावर जात आहे. तसेच २०१८ पासून कोरोना योद्धा आशाा, गटप्रवर्तकांना केंद्र सरकारने मोबदला वाढ केली नाही. तरी नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधानाना आमच्या मागण्या पोहचव्यात व न्याय द्यावा अशी मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले यांनी निवेदन द्वारे केली आहे.

आशा गटप्रवर्तक संप मागण्या व केंद्र सरकारने मोबदला वाढ व गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या.महाराष्ट्र मध्ये आशा व गटप्रवर्तकांनी १८ ऑक्टोबर २०२३ ते १ नोव्हेंबर २०२३ पर्यंत संप केला. संप मागण्या बाबत आरोग्य मंत्री महाराष्ट्र शासन यांनी आरोग्य भवन, मुंबई येथे कृती समिती सोबत बैठक घेऊन अशांना दरमहा ७ हजार रूपये व गटप्रवर्तकांना १० हजार रूपये मोबदला वाढ व दरवर्षी आशा गटप्रवर्तकांना २ हजार रूपये भाऊबीज भेट देण्याचे व गटप्रवर्तकांना कंत्राटी दर्जाबाबत केंद्र सरकार ला प्रस्ताव पाठविण्याचे लेखी आश्वासन दिले. माञ, अद्याप शासन निर्णय काढलेला नाही. 

देसले म्हणाले, आयटक सलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने विनंती करतो की, त्वरित महाराष्ट्र शासनाने संप काळात मान्य केलेल्या मागण्याबाबत शासन निर्णय काढण्यात यावा. तसेच आरोग्य अभियानाचे आयुक्त यांनी केंद्रं सरकारला गटप्रवर्तक बाबत दिलेला कंत्राटी कर्मचारी दर्जा प्रस्ताव मंजूर करावा. याबाबत निर्णय व्हावा. आशांना ऑनलाइन कामाबाबत सक्ती केली जात आहे. याच अल्पशिक्षित आशांना मोबाईल व रेंज च्या अडचणी येत आहेत. तरी आशांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन सक्ती करण्यात येऊ नये. दि. १२ जानेवारी २०२४ पासून राज्यव्यापी आशा गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने संपावर वरील मागण्यासाठी जाणार आहेत. 

देशाचे पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर १२ जानेवारी २०२४ रोजी येत आहेत. कोरोना योद्धा आशा व गटप्रवर्तकांना २०१८ पासून केंद्र सरकारने मोबदला वाढ केली नाही. तरी कोरोना योद्धा आशा गटप्रवर्तकांना किमान वेतन देऊन सन्मान केन्द्र सरकारने करावी, अशी मागणी आशा व गटप्रवर्तक आयटक च्या वतीने करण्यात आली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय