Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणराजूर ग्राम सभेत राजूर विकास संघर्ष समितीचे २० मागण्यांचे निवेदन, ग्रामसभेत चर्चा...

राजूर ग्राम सभेत राजूर विकास संघर्ष समितीचे २० मागण्यांचे निवेदन, ग्रामसभेत चर्चा करून ठराव

spot_imgspot_imgspot_imgspot_img

राजूर कॉलरी : कोरोना-१९ च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून न झालेली ग्रामसभा दि.४ ऑक्टो ला घेण्यात आल्याने गावकरी मोठ्या संख्येने आपल्या समस्या घेऊन आले होते. यामध्ये राजूर विकास संघर्ष समितीने २० मागण्यांचे निवेदन ग्रामसभेत देऊन चर्चा घडवून आणून अनेक ठराव घ्यायला लावले. 

गावातील अपूर्ण असलेले रस्ते पूर्ण करावीत, साई नगर व शहीद बिरसा मुंडा नगरात अद्यापही सांडपाण्याच्या नाल्या नसल्याने ते बांधावेत, संपूर्ण गावात एकही कचरा कुंडी नसल्याने कचरा इतरस्त्र फेकण्यात येते आणि तो सगळीकडे पसरतो याकरीता कचरा कुंड्या देऊन कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, ओला व सुका कचऱ्यासाठी वेगवेगळ्या कचरा कुंडी द्याव्यात, आठवडी बाजारात कुठलीही व्यवस्था नसल्याने ओटे, रस्ते बांधून लाईट ची व्यवस्था करावी. गावातील चिकन, मटण व मच्छी मार्केट आठवडी बाजारात हलवावे, गावातील महापुरुषांच्या नावाने असलेल्या चौकाचे सौंदर्यीकरण करून त्या ठिकाणी हायमास्ट लाईट व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, घरकुल यादीत पात्र लोकांची नावे समाविष्ट करावीत, घरकुल यादीत नावे असलेल्यांकडे जागा नसल्यास त्यांना दीनदयाळ योजनेंतर्गत जागा घेऊन द्यावी, वेकोलीच्या जागेवर अतिक्रमित लोकांना एकतर कायमचे पट्टे द्यावीत किंवा त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांचा परिवाराला आर्थिक सहायता मिळवून द्यावी आदी मागण्यांचे निवेदन देऊन समितीचे कॉ. कुमार मोहरमपुरी, साजिद खान व जयंत कोयरे यांनी चर्चा करून ग्रामसभेत ठराव घ्यायला लावले.

गावातील जनतेने ह्या ग्रामसभेत मोठ्या संख्येने भाग घेत रस्ते, नाल्या, घरकुल, नाली सफाई, आदी समस्या ठेवल्या.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय