धारूर : केंद्र सरकारने व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल, जीवनावश्यक वस्तुचे भाव वाढवुन शेतकरी, शेतमजुर, कामगार यांच्या विरोधात काळे कायदे केल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष धारूरच्या वतीने निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने व राज्य शासनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तुचे भाव वाढवुन शेतकरी, शेतमजुर व कामगार विरोधी काळे कायदे करून जनतेला वेठीस धरले आहे. या विरोधात माकपच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा, कामगार विरोधी चार श्रमसंहिता कायदे मागे घ्या, शालेय पोषण आहार कामगारांना नियमित मानधन द्या, मनरेगाची कामे तात्काळ सुरू करा, तालुक्यातील मनरेगा अंतर्गत गाय गोटे, शेळी पालन शेड, कुकुटपालन शेड इत्यादी कामे तात्काळ सुरू करा, चिंच पुरगावजी राशन व्यवस्था ग्रामपंचायतला जोडा इत्यादीसह अनेक मागण्याचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर डॉ. अशोक थोरात, कॉ. मोहन लांब, अॅड. संजय चोले, रणविर डापकर, रामधन डापकर, बाळराजे सोळंके इत्यादीच्या सह्या आहेत.