मुंबई : महाराष्ट्रातील छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. (levied lands)
या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या सुमारे ४ हजार ८४९ एकर आकारीपड जमिनी (levied lands) शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्याच्या कायद्यानुसार, थकबाकीची देय रक्कम आणि व्याज १२ वर्षांच्या आत भरल्यास जमीन मूळ खातेदारांना परत करण्याची तरतूद आहे. मात्र, १२ वर्षांनंतर ही परतफेड शक्य नव्हती. आता, प्रचलित बाजारमूल्याच्या २५ टक्के रक्कम वसूल करून अशा जमिनी मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याची तरतूद करण्यात येणार आहे.
Levied lands return to original holders
या सुधारणेसंदर्भात विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळून आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्याचा मार्ग सुकर होईल.


हे ही वाचा :
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !
‘डॉक्टरांनी केले मृत घोषित, रूग्ण आला घरी चालत’ या अजब घटनेची जोरदार चर्चा
पुणे मेट्रो फेज 2 मध्ये सात नवीन मार्गांचा समावेश
अभिनेता दिलीप शंकर यांचे निधन, हॉटेलच्या खोलीत आढळला मृतदेह
मोठी बातमी : पुजाऱ्यांना मिळणार दरमहा 18,000 सन्मान निधी
मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता